खोटी तक्रार दिल्याची दिली कबुली
माजी नगराध्यक्ष प्रेम झाडे लाचलुचपत प्रकरण
नागपूर / अरुण कराळे ( खबरबात )
वाडी नगर परिषदचे माजी नगराध्यक्ष प्रेम झाडे यांना १७ मे २०१९ रोजी सकाळी १० वा लाचलुचपत विभागाने २० हजार रुपयाचे लिफाफा बंद पॉकेट घेताना रंगेहात पकडले होते फिर्यादी कंत्राटदार संजय खोडे याचे तीन महिन्यापासून वेतन थकीत होते ते काढण्यासाठी नगराध्यक्ष प्रेम झाडे यांना विनंती केली असता त्यांनी २४ हजाराची लाच मागितली परंतु संबंधित कंत्राटदाराला लाच दयायची नसल्याने त्याने १६ मे २०१९ ला लाचलुचपत विभागाला तक्रार केली होती.त्यापैकी २० हजाराची बंद पॅकेट मधील रक्कम घरी स्वीकारतात लाचलुचपत विभागाने सापळा रचल्यानुसार प्रेम झाडे यांना रंगेहात पकडल्याने खळबळ उडाली होती. हे प्रकरण न्यायालयीन असून प्रेम झाडे यांना पोलीस कोठडी व न्यायालयीन कोठडी सुन्यावण्यात आली होती . २० हजार रुपये लिफाफा बंद देणारा कंत्राटदार संजय कृष्णराव खोडे हा सध्या मानसीक तणावात आला असुन ६ ऑगस्ट रोजी आत्महत्या करीत असतांना घरच्या कुटूंबीयांनी त्याला वाचविले . तरी तो मी आत्महत्या करणार हाच नारा घेऊन सोमवार १९ ऑक्टोंबर रोजी सकाळी ९ वाजता माजी नगराध्यक्ष प्रेम झाडे यांच्या घरी त्याची आई शोभा कृष्णराव खोडे,
बहीण सुर्वणा बिसे, भाऊ मेघराज खोडे रा .बीडीपेठ नागपूर हे सर्व कुटूंब आले लाच प्रकरण झाले त्यामध्ये मला माफ करा, जर माफ करीत नसेल तर मी येथेच आत्महत्या करणार असे संजय खोडे ओरडत होता . उपस्थित माजी नगराध्यक्ष प्रेम झाडे कुटूंब या प्रकारामुळे हादरल्या गेले . त्यांना वाटले की कंत्राटदार अजुन काही नवीन मार्ग शोधण्याच्या प्रकारात तर नाही ना ? पुन्हा आपल्याला फसविणार तर नाही ना ? अशी मनात शंका आली लगेच प्रेम झाडे यांनी वाडी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाठक यांना या प्रकरणाची मोबाईल द्वारे कल्पना दिली . लगेच वाडी पोलीस घटनास्थळी दाखल होऊन खोडे कुटुंब व झाडे कुटूंब यांना वाडी पोलीस स्टेशनमध्ये आणले . वाडी पोलीस स्टेशन मध्ये गेल्यावरही संजय खोडेचा एकच नारा होता मला लाचलुचपत प्रकरणात माफ करा अन्यथा मी आत्महत्या करतो . प्रेम झाडे यांनी मला लाच मागीतली नव्हती कोणाच्या तरी सांगण्यावरुन मी खोटी तक्रार दाखल केली होती असा पोलीसांना सांगत होता पोलीसांनी संजय खोडे याला शांत केले सवीस्तर माहिती जाणून घेतली लाच लुचपत प्रकरण न्यायालयीन प्रकरण असल्यामुळे तुम्हाला जी बाजु मांडायची आहे ती न्यायालयात मांडा . संजय खोडे यांना शांत करण्यासाठी वाडी पोलीस स्टेशन मध्ये पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंध विभाग नागपूर यांच्या नावाने तक्रार लिहून घेतली . या तक्रारीत संजय खोडे यांनी लिहीले आहे की मी असेंह बहुउद्देशीय सेवा सहकारी संस्थेचा माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य आहे दि . १७ मे २०१९ रोजी मी व रितेश गमे इतरांच्या सांगण्यावरुन प्रेम झाडे यांच्या विरोधात मला असेंट बहुउद्देशीय सेवा सहकारी संस्था , नागपूर द्वारा नगर परिषद वाडी येथील कामावरील नियुक्त इंजिनीअरचे तीन महीन्याचा पगार वाढुन दिल्याबद्दल २० हजार रुपयाची मागणी केल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंध विभाग सिव्हील लाईन नागपूर येथे केली होती . मी खोटी तक्रार दाखल केली असुन नगराध्यक्ष प्रेम झाडे यांनी आम्हाला कुठलेही पैसे मागीतले नव्हते मी इतराच्या दबावात हे काम केल्यामुळे मला आज पश्चाताप होत आहे . त्यामुळे मी स्वतःहुन माफी मागण्यासाठी प्रेम झाडे यांच्या घरी गेलो . न्यायालयात सुध्दा हीच बाजु मांडणार असल्याचे पत्रात नमुद केले .
_____________________________________
प्रतिक्रिया .
माजी नगराध्यक्ष प्रेम झाडे
३० वर्षाच्या राजकारणात ज्यांनी खडा टाकला त्यांचे काय ? तक्रार करणाऱ्याला आपली चुक समजली हा जरी माझ्यासाठी विजय असला तरी तो विजय मला मान्य नाही . मानवीय दुष्टीकोनातून मी खोडे कुटूंबांना माफ केले परंतु या प्रकरणात मला आणि माझ्या कुटूंबांला जो नाहक त्रास झाला तो त्रास मी कधीही विसरू शकणार नाही माझ्या अंगावर ज्यांनी शिंतोडे उडविले त्यांचे मी काय वाकडे केले होते . राजकारणात बदला घ्यायचा असते तो असा बदला घेणे म्हणजे भ्याड पणाचे लक्षण आहे . निवडणूकीच्या माध्यमातुन बदला घ्यायला पाहिजे होता . चुकीचे आरोप करून बदला घेत येत नाही हे आजच्या प्रसंगावरून पुन्हा सिद्ध झाले .