माजी सैनिक संघटना काटोलच्या वतीने नरखेड तालुक्यातील मसोरा गावातील भारतीय सिमेवर 30 वर्ष योद्ध लढणारे गावातील पहीले जवान श्री सुरेश भाऊरावजी दोडके यांच्या आज सैनिक सत्कार समारंभ
काटोल / प्रतिनिधी
आपल्या हृदयात सैनिकांनाप्रती आस्था सदैव असली पाहिजे. देशाची शान सैनिक आहेत. धन्य ते सैनिक जे आपल्या आई-वडील, पत्नी-मुलांना सोडून देशाच्या रक्षणासाठी लढतात. अशा महान सैनिकांची दोनच दिवस का आठवण काढावी. त्यांच्यामुळे आपण रोज सुखाचे क्षण जगतो. आपल्या देशाची रक्षा करणं हे सैनिकाचं नव्हे तर प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे. ते महान सैनिक रात्रंदिवस झुंजतात. अशा सैनिकांसाठी आपल्या जीवनात महत्त्वाचं स्थान असावं. प्रत्येक व्यक्तीच्या मनात आपल्या देशाच्या प्रति मान, अभिमान असावा. आजच्या या पिढीने सैनिकांच्या पावलावर पाऊल ठेऊन नवीन बदल घडून आणावा. प्रत्येकाने आपली वेगवेगळी जबाबदारी पार पाडावी. नरखेड तालुक्यातील मसोरा येथील श्री सुरेश भाऊरावजी दोडके यांच्या सैनिक सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री पुरुषोत्तम जोगेकर माजी सैनिक संघटना काटोल. कार्यकारी अध्यक्ष रत्नाकर ठाकरे सुभेदार दिगंबर गुडघे साहेब श्री जीवन गायकवाड कार्यक्रमाचे आयोजक व संचालन अशोक गावंडे यांनी केले अध्यक्ष भाषणातुन रत्नाकर ठाकरे यांनी गावातील तरूणांना देशरक्षणाकरीता प्रोस्ताहन केले. पंचवीस वर्षे सेवा करून निवृत्त झालेले दोडके साहेब गावाचे प्रेरणास्थान आहे. त्यांच्या मार्गदर्शनाने गावांमध्ये अलग अलग फोर्समध्ये 25 जवान सध्या भारतीय सिमेवर कार्यरत आहे. याचवतीने माजी सैनीक संघटना काटोल नेहमी या कार्याकरीता सक्रीय असुन व काटोल शहरातील तरूणांना नेहमी प्रोस्ताहन करत असतात.