सिरोंचा, ता. ३० : खर्रा, दारूमुक्त तालुका करण्यासाठी पोलिसठाणे व मुक्तिपथ यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील ११ गावांतील पोलिसपाटलांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत गावातील पानठेले सुरू होऊ नये, दारूविक्रीवर अंकुश घालण्यासाठी बैठकीत चर्चा करण्यात आली. तहसीलदारांच्या पत्रानुसार पोलिस पाटील यांनी पुढाकार घेऊन खर्रा व दारूमुक्त गाव करण्याचे आवाहन करण्यात आले.
तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करून थुंकण्यामुळे कोरोना विषाणूंचा प्रसार अधिक वेगाने होते. यामुळे राज्य सरकार व जिल्हाधिकारी यांनी तंबाखूजन्य पदार्थ विक्रीवर बंदी घातली आहे. तरीसुद्धा चोरट्या मागार्ने मोठ्या प्रमाणात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री सुरू आहे. जिल्ह्यात दारूबंदी लागू असूनही अवैध दारूविक्री सुरू आहे. जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर व तेलंगणा राज्य सीमेवरील सिरोंचा तालुक्यात अवैध धंद्यांना ऊत आला आहे. यावर नियंत्रण ठेऊन खर्रा व दारूमुक्त तालुका करण्यासाठी पोलिस विभाग व मुक्तिपथ अभियानाने पुढाकार घेऊन तालुकाभरातील पोलिस पाटलांची बैठक बोलावली.
या बैठकीमध्ये खर्रा व दारूमुक्त गाव करण्यासाठी चर्चा करण्यात आली. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर तहसीलदार यांनी पत्र काढून अवैध व्यवसायावर तत्काळ कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे. यासाठी गाव पातळीवर ग्रामसेवक, सरपंच व पोलिस पाटील यांचे पथक तयार केले आहे. या माध्यमातून गावातील पानठेले पुन्हा सुरू करू द्यायचे नाही, गावात दारूविक्रीवर अंकुश लावा. बाहेरून दारू येत असल्यास त्यांना पकडून पोलिसांना माहिती द्या, अशी माहिती पोलिस पाटील यांना सिरोंचाचे पोलिस निरीक्षक अजय अहिरकर व मुक्तिपथ तालुका संघटक सुनीता भगत यांनी दिली. तसेच तहसीलदार यांच्या पत्राची पत्र पोलिस पाटलांना देण्यात आली.