जुन्नर/ प्रतिनिधी
येथील वल्लभ नागरी पतसंस्थेचे चेअरमन सी बी गांधी (वय ७६)यांचे पुणे येथे उपचारादरम्यान निधन झाले.
जुन्नर तालुक्यात बांधकाम अभियंता म्हणुन त्यांनी व्यवसायास सुरुवात केल्यानंतर गांधी यांनी शासकीय ठेकेदार म्हणुन पुणे जिल्ह्यात आपले बस्तान बसविले. होता. जुन्नर मधील क्रांती तरुण गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातुन त्यांनी सामाजिक कार्यात सुरवात केली. क्रांती गणेश मंदीराचे बांध कामासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता. त्यानंतर त्यांनी जुन्नर मध्ये वल्लभ नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना केली .तसेच क्रांती सहकारी ग्राहक भंडाराची रोटरी क्लब ऑफ जुन्नर शिवनेरीचे ते सक्रिय सभासद होते.रोटरी भुषण,ज्येष्ठ नागरीक भुषण पुरस्काराने त्यांना सन्मानीत करण्यात आले होते. जुन्नर तालुका पतसंस्था फेडरेशन तसेच जिल्हा पातळीवर पतसंस्था संदर्भात अडीअडचणी सोडविण्यासाठी त्यांचा सक्रीय पुढाकार होता.माजी आमदार वल्लभ बेनके यांचे ते निकटचे सहकारी होते. गरजु विद्यार्थ्यांना शालेय साहीत्य वाटप,ज्येष्ठ नागरीक सन्मान,करोना लॉकडाऊन काळात अनाथ व्यक्तिंना भोजन असे विविध सामाजीक उपक्रम राबवीत त्यांनी सामाजीक बांधीलकी जपली.