नागपूर २६ ऑगस्ट : शहराच्या वाहतुकीच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे असलेले रहाटे कॉलोनी मेट्रो स्टेशनचे कार्य आता संपुष्टात आले आहे. या स्थानकाचा परिसर नैसर्गिक सौंदर्याने बहरलेला असून याच्या भोवताली जणू हिरवी मखमल पसरली आहे. स्टेशनला हिरवे स्वरूप देण्याचा निर्णय याच्या भोवताली असलेल्या परिसरामुळे महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ .ब्रिजेश दीक्षित यांनी घेतला.
या मेट्रो स्थानकाच्या आसपास आयटीआय, अंधविद्यालय, आरोग्य उपसंचालक कार्यालय, मध्यवर्ती कारागृह, इतर शासकीय तसेच सार्वजनिक कार्यालय आहेत. तसेच येथील रहिवासी भागात परीसरात राहणाऱ्या रहिवाश्यांना या स्थानकाचा लाभ मिळेल. वर्धा मार्गाहुन येणाऱ्या रस्त्यावरील प्रवाश्यांसाठी सध्यस्थितीत रहाटे कॉलोनी मेट्रो स्टेशन हा केंद्र बिंदू असून सदर मेट्रो स्टेशन सुरु झाल्यावर या परिसराचे महत्व वाहतुकीच्या दृष्टीने अधिक वाढणार आहे.
या शिवाय या स्टेशनला लागूनच परगावी जाण्या करिता बस थांब्याची सोय असल्याने दूरवर राहणारे नागपूरकर मेट्रोने प्रवास करत या स्टेशन पर्यंत प्रवास करत नागपूर बाहेर जाऊ शकतात. रोज प्रवास करणाऱ्या नागपूरकरांची मोठी सांख्य या बस थांब्यावर असते. त्यामुळे रोज लांबवर प्रवास करणाऱ्या शहरातील रहिवाश्यांकरिता हे मेट्रो स्थानक दिलासा देणारे ठरेल.
रहाटे कॉलोनी मेट्रो स्टेशनचे "ग्रीन लूक" : रहाटे कॉलोनी मेट्रो स्टेशन च्या परिसरात अनेक डेरेदार वृक्ष आहे. मेट्रो ट्रॅक च्या दोन्ही बाजूला मोठ मोठी हिरवी गार झाडे आहेत. हा परिसर वृक्षवेलींनी नटलेला असून येथून प्रवास करताना जंगलावून प्रवास केल्याचा आभास होतो. यामुळे स्टेशनला `ग्रीन लूक' दिले आहे.
मेट्रो स्टेशनसंबंधी विशेष माहिती:
रहाटे कॉलोनी मेट्रो स्टेशनची उभारणी ५७९७. ६९ वर्ग मीटर मध्ये करण्यात आले असून पहिल्या मजल्यावर तिकीट काउंटर, दुकाने, प्रसाधन गृह इत्यादीची व्यवस्था करण्यात आली आहे. स्थानकापर्यंत पोहोचण्याकरीता लिफ्ट आणि एस्केलेटर्सची व्यवस्था देखील या ठिकाणी करण्यात आली आहे. रेन-वाटर हार्वेस्टिंगचे प्रावधान या ठिकाणी करण्यात आले आहे. वरिष्ठ नागरिक आणि विकलांगांकरिता मेट्रो कोच पर्यंत पोहोचण्याकरीता विशेष व्यवस्था आहे; या सोयीमुळे प्रवाश्यांना कुठल्याही सहाय्यतेची आवश्यकता भासणार नाही. सर्व सोयी सुविधांनी युक्त असे हे मेट्रो स्थानक राहणार आहे.