▪ आज 12 जण कोरोनामुक्त
▪ जिल्ह्यात आत्तापर्यंत एकुण बाधित संख्या 1058
गडचिरोली. 28 : चामोर्शी शहरातील केवट मोहल्ला, किंभर मोहल्ला व मार्केट लाईनमधील 469 जणांची आज तपासणी केली त्यात 43 जण कोरोना बाधित असल्याचे आढळून आले. तर गडचिरोली येथे आज 16 नवीन कोरोना बाधित यामध्ये 1 आरोग्य कर्मचारी व त्याच्या संपर्कातील अजून 1, चामोर्शी येथून आलेला 1, रामनगर येथील 4, सामान्य रूग्णालयतील 7 यामध्ये कनेरी येथील एक, शिवनी येथील 1, चणकाईनगर येथील रुग्णालयात दाखल असलेला 1 असे 16 जण, विसोरा वडसा येथील 1 एसआरपीएफ, धानोरा येथील KGBV शाळेतील 1 स्वयंपाकी, सिरोंचा येथील विलगीकरणातील 4 व कुरखेडा येथील 1 असे मिळून आज 66 नवीन बाधित मिळाले.
तसेच आज 12 जण कोरोनामूक्त झाले यात गडचिरोली येथील 1 स्थानिक व 3 पोलीस, आहेरी 4 जण यात एकजण कर्करोगाने ग्रस्त होता त्याने कोरोनवार मात केली. भामरागड येथील 2 पोलीस तर चामोर्शी मधील 2 स्थानिकांनी कोरोनावर मात केली.
यामुळे जिल्हयातील सक्रिय कोरोना बाधितांची आकडेवारी 206 झाली. कोरोनामुक्त रूग्णांची संख्या 851 तर आत्तापर्यंत जिल्ह्यात एकुण बाधित संख्या 1058 झाली आहे.