Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, जुलै ११, २०२०

वाढिव वीज बिल विरोधात भाजप अनुसूचित जाती मोर्चा तर्फे 'नगारा आंदोलन'



प्रदेश सचिव ॲड. धर्मपाल मेश्राम यांचे नेतृत्व


नागपूर, ता. ११ : महाराष्ट्र राज्य सरकारच्या विद्युत विभागातर्फे पाठविण्यात आलेल्या वाढिव वीज बिल विरोधात भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा नागपूर तर्फे शनिवारी (ता.११) उत्तर नागपुरातील कमाल चौकात 'नगारा' वाजविण्यात आला. राज्य शासनाच्या विद्युत विभागाच्या मनमानी धोरणाविरोधात भाजपा प्रदेश सचिव ॲड. धर्मपाल मेश्राम यांच्या नेतृत्वात हे 'नगारा आंदोलन' करण्यात आले.

सोशल डिस्टंनसिंग राखत आणि कोव्हिड संदर्भातील नियमांचे पालन करून झालेल्या या आंदोलनात आमदार गिरीश व्यास, माजी आमदार डॉ. मिलिंद माने, मनपा सत्ता पक्षनेते संदीप जाधव, अशोकजी मेंढे, सुभाषजी पारधी, भोजराज डुंबे, संजय चौधरी, प्रभाकर येवले, नगरसेवक सर्वश्री अमर बागडे, संदीप गवई, विजय चुटेले, लखन येरवार, महेंद्र धनविजय, हरीश दिकोंडवार, नगरसेविका उषाताई पॅलेट, निरंजना पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.

लॉकडाऊनमध्ये तीन महिने वीज बिल पाठविणार येणार नसल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. मात्र तीन महिन्यानंतर आता रिडींगविना सरसकट तीन महिन्याचे वाढिव वीज बिल पाठविण्यात आले आहे. कोरोनाच्या या काळात वाढिव वीज बिलामुळे सर्वसामान्य नागरिकांचे चांगलेच हाल होत आहेत. राज्य शासनाच्या या कृतीचा भाजप अनुसूचित जाती मोर्चा तर्फे 'नगारा' वाजवून निषेध नोंदवला.

सर्व कोव्हिड नियमांचे पालन करून झालेल्या या आंदोलनाच्या यशस्वीतेसाठी अनुसूचित जाती मोर्चाचे महामंत्री सतीश शिरसवान, ॲड राहूल झांबरे, विशाल लारोकर,मनीष मेश्राम, राहूल मेंढे, शंकर मेश्राम, अजय करोसिया, संदीप बेले, बंडू गायकवाड, इंद्रजीत वासनिक, विजय फुलसूंगे व अन्य पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले.

याप्रसंगी नेताजी गजभिये, मोती जनवारे, ममता हत्तीठेले, महेश पाटील, रोहन चांदेकर, संजय कठाडे, शंकरराव वानखेडे, प्रकाश चमके, गीताताई येल्लुरकर, नम्रता माकोडे, शशिकला बावणे, प्रदीप मेंढे, जगदीश बमनेट, राजू हत्तीठेले, अशोक डोंगरे आदींनी आंदोलनात सहभाग घेतला होता.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.