Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, जून १४, २०२०

धक्कादायक बातमी : पवित्र रिश्तातील मानवची आत्महत्या



मुंबई : दूरचित्रवाहिनीवरील पवित्र रिश्ता लोकप्रिय मालिकेतील मानवची भूमिका साकारणारे आघाङीचे कलावंत सुशांत सिंग राजपूत याने आत्महत्या केली आहे. वांद्र्यातील घरी गळफास घेऊन त्यांनं आत्महत्या केल्याची माहिती आहे. सुशांत हा नैराश्यात होता अशी माहिती मिळाली आहे. आपल्या घरातील एका खोलीत त्यानं पंख्याला गळफास घेत जीवन संपवलं. काही दिवसांपूर्वी त्याच्या मॅनेजर असलेल्या दिशाने आत्महत्या केली होती. तेव्हापासून होता डिप्रेशनमध्ये असल्याची माहिती मिळाली .

सुशांत सिंह राजपूतचा जन्म 21 जानेवारी 1986 रोजी झाला होता. सुरुवातीला मालिकांमधून आपल्या सुरूवात करणाऱ्या सुशांतने 2013 सालच्या काय पोछे या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटासाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीचा स्क्रीन पुरस्कार मिळाला होता. तेव्हापासून सुशांतने काही निवडक हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या होत्या.
त्याच्या कारकिर्दीला खरा ब्रेक मिळाला तो धोनीवर केलेल्या बायोपिकमधील भूमिकेनंतर. त्यांनं एम.एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी मध्ये महेंद्रसिंह धोनीची भूमिका केली होती.
सोबतच शुद्ध देसी रोमान्स, पी.के., डिटेक्टिव्ह व्योमकेश बक्षी अशा सिनेमांमध्ये त्याने लक्षवेधी भूमिका निभावल्या होत्या. अभिनय क्षेत्रात त्यानं किस देश में है मेरा दिल या मालिकेद्वारे पदार्पण केले होते. तर पवित्र रिश्ता या मालिकेद्वारे तो घराघरात पोहोचला होता.

दरम्यान या घटनेवेळी त्याचे मित्र देखील त्याच्या घरी होते. तो बाहेर येत नसल्याने मित्रांनी दरवाजा तोडला, त्यावेळी हा धक्कादायक प्रकार समोर आला. याबाबत माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले असल्याची माहिती आहे.

दूरचित्रवाणी माध्यमातून कारकिर्दीची सुरूवात करणाऱ्या सुशांतने २०१३ सालच्या काय पोछे ह्या चित्र्पटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ह्या चित्रपटासाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीचा स्क्रीन पुरस्कार मिळाला होता.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.