वाडी ते वडधामना परिसरात गोडावून असल्यामुळे नागपूरचा व्यवसाय याच परिसरातून चालतो. देशभरातून वस्तू येथे आणल्या जातात व खाली केल्या जातात. वडधामना परिसरात सडलेल्या सुपारीचा माल असल्याची माहीती शिवसेना महाराष्ट्र वाहतुक सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष राकेश अग्रवाल यांनी दिली असता गुप्त माहीतीच्या आधारे अन्न व औषध प्रशासन विभाग दक्षता पथक द्वारे गुरुवार १८ जून रोजी संध्याकाळी ७ वाजता इंडो आर्या सेंट्रल गोडाऊनवर छापा मारण्यात आला. ही कारवाई शुक्रवार च्या पहाटे ३ वाजता पर्यंत चालत राहाली.
या गोडावूनमध्ये ३९ हजार २१३ किलो अंदाजे १ करोड १ लाख ४७ हजार रुपयाची सडलेली सुपारी जप्त केली . वाडी व वडधामना क्षेत्रातील गोडाऊनमध्ये दोन नंबरचा अवैध माल असल्याची माहीती शिवसेना महाराष्ट्र वाहतुक सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी गुप्त माहीती च्या आधारे दिली . वडधामना परिसरात सडलेल्या सुपारीचा माल असल्याची माहीती शिवसेना महाराष्ट्र वाहतुक सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष राकेश अग्रवाल यांनी इतर राज्यातुन सडलेली सुपारी येत असून गोडावूनमध्ये जमा केल्याची माहीती दिली.
शनिवार २० जुन रोजी वडधामना येथील जबलपुर गुड्स गैरेजच्या पार्किंग मध्ये २५ टन सुपारी एका ट्रकातून दुसऱ्या ट्रक मध्ये भरत असतांना वाहतुक सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा प्रमुख गणेश कान्हारकर यांना सुचना दिली . लगेच याची माहीती खासदार कृपाल तुमाने,शिवसेना जिल्हा प्रमुख राजेंद्र हरणे , युवासेना जिल्हा प्रमुख हर्षल काकडे यांना माहीती दिली . लगेच एफ डी आय विभागाचे सीनियर अधिकारी श्री पवार घटनास्थळी दाखल झाले .
अंदाजे ६० लाख रुपयाची सुपारी जप्त केल्याची माहीती आहे. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष राकेश अग्रवाल, जिल्हा कार्यध्यक्ष भाऊराव रेवतकर,स्वप्निल बोरोड़े,जिल्हा सचिव कुमार सव्वाशेरे व अखिलेश सिंह,तालुका प्रमुख राम सिंह,वाड़ी शहर प्रमुख अभय वर्मा व नागेंद्र सिंह उपस्थित होते .