WhatsApp Messenger हे Android आणि अन्य स्मार्टफोनसाठी उपलब्ध असलेले मोफत मेसेजिंग ॲप आहे. तुम्हाला संदेश पाठवू देण्यासाठी आणि मित्रमैत्रिणी आणि कुटुंबियांना कॉल करू देण्यासाठी, WhatsApp तुमच्या फोनचे इंटरनेट कनेक्शन (4G/3G/2G/EDGE किंवा वाय-फाय, जे उपलब्ध असेल ते) वापरते. संदेश, कॉल्स, फोटो, व्हिडिओ, डॉक्युमेंट्स आणि व्हॉइस मेसेज पाठवण्यासाठी आणि प्राप्त करण्यासाठी, एसएमएस वापरणे सोडून WhatsApp वापरणे सुरु करा.
WHATSAPP का वापरायचे :
• शुल्क नाही : तुम्हाला मित्रमैत्रिणी आणि कुटुंबियांना संदेश पाठवता यावा आणि कॉल करता यावा यासाठी WhatsApp तुमच्या फोनचे इंटरनेट कनेक्शन (4G/3G/2G/EDGE किंवा वाय-फाय, जे उपलब्ध असेल ते) वापरते, यामुळे तुम्हाला प्रत्येक संदेश किंवा कॉलसाठी शुल्क द्यावे लागणार नाही.* WhatsApp वापरण्यासाठी कोणतेही सदस्यता शुल्क लागत नाही.
• मल्टिमीडिया : फोटो, व्हिडिओ, डॉक्युमेंट्स आणि व्हॉइस मेसेज पाठवा आणि प्राप्त करा.
• निःशुल्क कॉल्स : WhatsApp कॉलिंग सह तुमच्या मित्रमैत्रिणी आणि कुटुंबियांना कॉल करा, अगदी ते परदेशात असतानाही. * WhatsApp कॉल्स तुमच्या सेल्युलर योजनेच्या व्हॉइस मिनिटांऐवजी तुमच्या फोनचे इंटरनेट कनेक्शन वापरते. (टीप : *डेटा शुल्क लागू शकते. अधिक माहितीसाठी तुमच्या प्रोव्हायडरशी संपर्क साधा. तसेच, तुम्ही WhatsApp द्वारे १०० आणि अन्य आपात्कालीन सेवा नंबर ॲक्सेस करू शकत नाही.)
• ग्रुप चॅट : तुमच्या संपर्कांसह ग्रुप चॅटचा आनंद घ्या जेणेकरून तुम्ही सहजपणे तुमच्या मित्रमैत्रिणी किंवा कुटुंबियांच्या संपर्कात राहू शकता.
• WHATSAPP वेब : तुम्ही तुमच्या कॉम्प्युटरच्या ब्राउझरवरून देखील WhatsApp संदेश पाठवू आणि प्राप्त करू शकता.
WhatsApp संदेश आंतरराष्ट्रीय स्तरावर पाठवण्यासाठी अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. जगभरातील तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत चॅट करा आणि आंतरराष्ट्रीय एसएमएस शुल्क टाळा.*
• युझरनेम्स अर्थात वापरकर्ता नाव आणि पिन्स ची गरज नाही : आणखी एक वापरकर्तानाव किंवा पिन लक्षात ठेवण्याची काळजी कशाला? एसएमएस प्रमाणेच WhatsApp देखील तुमचा फोन नंबर वापरते आणि तुमच्या फोनमध्ये असलेल्या ॲड्रेस बुकसह विनासायास एकत्रित होते.
• नेहमी लॉग इन केलेल रहा : WhatsApp वर तुम्ही नेहमीच लॉग इन केलेले राहता त्यामुळे तुमचा कोणताही मेसेज सुटत नाही. तुम्ही कुठे लॉग इन केले आहे किंवा कुठे लॉग आउट केले आहे याविषयी आणखी गोंधळ नाही.
• तुमच्या संपर्कांसह त्वरित कनेक्ट व्हा : तुम्हाला WhatsApp असलेल्या तुमच्या संपर्कांसह त्वरित आणि सहजपणे कनेक्ट करण्यासाठी तुमचे ॲड्रेस बुक वापरले जाते, यामुळे आता लक्षात ठेवण्यास अवघड अशी वापरकर्तानावांची गरज नाही.
• ऑफलाईन मेसेजेस : तुम्ही तुमच्या अधिसूचना बघितल्या नाहीत किंवा तुमचा फोन बंद ठेवला असला तरीही, पुढील वेळी तुम्ही ॲप वापरेपर्यंत WhatsApp तुमचे अलीकडील संदेश जतन करेल.
• आणि बरंच काही : तुमचे लोकेशन शेअर करा, संपर्क शेअर करा, कस्टम वॉलपेपर आणि नोटिफिकेशन्सचा आवाज सेट करा, एकापेक्षा अधिक संपर्कांना एकाच वेळी, संदेश ब्रॉडकास्ट करा आणि बरेच काही!