लायन्स क्लब ऑफ जुन्नर (शिवनेरी) यांच्या वतीने स्यानीटायझर ने हात धुण्याकरिता उपयुक्त वितरण
जुन्नर : आनंद कांबळे
शासकीय कार्यालयात, कार्यालयीन कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांचा कोरोना विषाणु संसर्गापासून बचाव होऊन, सुरक्षा मिळावी. या सामाजिक हेतुने लायन्स क्लब ऑफ जुन्नर (शिवनेरी) यांच्या वतीने जुन्नर येथील दिवाणी व फौजदारी न्यायालय, तहसील कार्यालय, पंचायत समिती, शासकीय रुग्णालय , जुन्नर पोलीस स्टेशन, जुन्नर नगर परिषद, स्टेट बँक ऑफ इंडिया , बँक ऑफ इंडिया ,या जनसंपर्क येत असलेल्या कार्यालयांमध्ये जाऊन , सँनीटायझर ने हात धुण्याकरिता फूट ऑपरेटेड हॅन्ड सँनीटायझर यंत्राचे वाटप केले.
जनसंपर्क येत असलेल्या जुन्नर नारायणगांव येथील शासकीय कार्यालयांना सँनीटायझर ने हात धुण्याकरिता फूट ऑपरेटेड हॅन्ड सँनीटायझर एकुण ५० यंत्राचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती लायन्स क्लब ऑफ जुन्नर (शिवनेरी) चे अध्यक्ष अँड. हेमंत भास्कर यांनी दिली.
तहसील कार्यालय जुन्नर येथे तहसीलदार हनुमंत कोळेकर, नायब तहसीलदार सचिन मुंढे यांचे समक्ष सदर यंत्राचे प्रात्यक्षिक करून दाखवण्यात येऊन,लायन्स क्लब ऑफ जुन्नर (शिवनेरी) यांच्या वतीने कोरोनाच्या संकटकाळात नागरिकांसाठी करण्यात येत असलेल्या मदातकार्याची माहिती लायन्स संजय गांधी यांनी दिली.
यावेळी तहसीलदार हनुमंत कोळेकर, नायब तहसीलदार सचिन मुंढे ,नगराध्यक्ष श्री शामराव पांडे , मुख्याधिकारी सौ काटकर ,पोलीस निरीक्षक युवराज मोहिते लायन्स क्लब ऑफ जुन्नर (शिवनेरी) चे अध्यक्ष अँड. हेमंत भास्कर , सचिव संजय गांधी लायन्स संतोष रासने, मिलिंद झगडे, लक्ष्मीकांत काजळे विश्वास भालेकर ,संतोष रासने, राजेंद्र पवार, पत्रकार हितेश गांधी यांची उपस्थिती होती.