कावरापेठ येथील तरूणाईचा व्हाट्सअप्प ग्रुप द्वारे उपक्रम
हिंगणघाट ते मंडला, बालाघाट (म.प्र) येथील मजदूरणा कावरापेठ उमरेड येथे मदतीचा हात देऊन त्यांची केली उत्तम व्यवस्था
उमरेड- कोरोनासारख्या जीवघेण्या रोगानेसंपूर्ण जगात हाहाकार माजविला आहे. अश्या कठीण परिस्थित कावरापेठ येथील काही तरुण एकत्रित येऊन व्हाट्सअप्प ग्रुप द्वारे गरजू लोकांनाची मदत करीत आहे.हिंगणघाट येथे कापूस जिनिग येथे काम करीत असलेल्या पंधरा मजुरांनी पायी चालत उमरेड पर्यंतचा प्रवास केला. व कावरापेठ येथे काही तरुण सामाजिक कार्यकर्त्यांना ते दिसले त्यानंतर त्यांना कुही फाटा येथे बालजीपुरम ले-आऊट चे संचालक दिलीप बंग यांच्याशी संपर्क साधून तात्पुरती त्यांची राहण्याची सोय करण्यात आली. दुपारी नाश्ता व रात्री सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी आप-आपल्या घरून जेवणाचे डब्बे आणून त्यांची जेवणाची व्यवस्था करण्यात आली व पुढचा प्रवासासाठी त्यांना बिस्कीट चे पॉकेट सुद्धा देण्यात आले. यावेळी कावरापेठ येथील स्वनिल डहाके, संतोष महाजन, रुपेश मोंगसे, राहुल गवळी, निखिल डहाके, संजय गवळी, राकेश डहाके, विजय गवळी, सारंग डहाके शंतनू चोबे , समीर आंबेकर, रोशन डहाके, मंगेश महाजन, रितिक कुंभरे, प्रणय चिंचुलकर, स्वनिल नवघरे, तुषार मेश्राम, हर्षल आंबेकर, युवराज चचाने तरुण सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.