Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, मे ०४, २०२०

एक हजार दोन आदिम कुटूंबांपर्यंत पोहोचविले तेल, तिखट, मीठ, साखर





कोलाम विकास फाऊंडेशनच्या उपक्रमात शेतकरी संघटना, नाम फाऊंडेशन, फ्रेन्डस् स्पोर्टींग क्लब, वेकोली अधिकारी व कर्मचारी तसेच अनेक दानशूरांचे अत्यंत महत्वाचे योगदान

चंद्रपूर/ प्रतिनिधी
कोरोना संक्रमणाच्या भितीने चंद्रपूर जिल्ह्यात जिवती, कोरपना व राजुरा तालुक्यात वास्तव्य करून राहणा-या आदिम कोलाम समुदायापुढे बिकट परिस्थिती निर्माण झाली. शासनाने 'तांदूळ' पुरविले. मात्र, चुलीजवळील तिखट मीठाचे डबे रिकामे वाजू लागले. कोलाम गुड्यावरील कोणालाही बाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला. यासाठी गुड्याचे पोचमार्ग बंद करण्यात आले. कुणी कामावर बोलवायला येत नव्हते, त्यामुळे रोजंदारीचे काम बंद पडले. बाहेर कुणी उधार द्यायला तयार नाही, घरातले कापूस, तूर, ज्वारी विकायची सोय उरली नाही. शेजारच्या गावातील आठवडी बाजारही बंद पडले. या सगळ्या परिस्थितीत भोळा-भाबडा आणि भित्र्या स्वभावाचा कोलाम चांगलाच अडचणीत सापडला.
विकासाच्या मुख्य प्रवाहापासून कोसो लांब असलेल्या आदिम कोलामांच्या डोक्यात विकासाचे आणि परिवर्तनाचे स्वप्न घालून त्यांना मार्गस्थ करणारी कोलाम विकास फाऊंडेशनने *कोलाम सहाय्यता अभियान* सुरु केले. या अभियानाला शेतकरी संघटनेचे नेते, माजी आमदार अँड. वामनराव चटप यांनी सक्रीय पाठींबा जाहीर करून प्रत्येक कोलाम कुटूंबांपर्यंत मदत पोहोचविण्याचा ध्यास घेतला.
जिवती तालुक्यातील मारोतीगुडा, रायपूर, खडकी, कलीगुडा, लेंडीगुडा, काकबन, भूरी येसापूर, टाटा कोहळ, बापूराव गुडा, लांबोरी, सिंगारपठार, धनकदेवी, येल्लापूर, गुडशेला, नोकेवाडा, मरकलमेटा, बांबेझरी, सितागुडा, लचमागुडा, जनकापूर, आंबेझरी, कलगुडी, आनंदगुडा, भोक्सापूर, जालीगुडा,शेणगाव कोलामगुडा, ताडी हिरापूर कोलामगुडा, कोरपना तालुक्यातील थिप्पा, दसरूगुडा, राजुरा तालुक्यातील घोट्टा व कोष्टाळा कोलामगुडा, गोंडपिपरी तालुक्यातील दुब्बागुडा (करंजी) अशा 32 गुड्यांवरील कोलाम व गोंड समुदायातील कुटूंबांपर्यंत तेल, तिखट, मीठ, हळद, दाळ, चना, बरबटी, साखर, कांदे, आलू, साबण, बिस्कीट पुडा आदि जिन्नस पोहोचविण्यात आले.

या कामात अनेक देणगीदात्यांनी भरीव मदत केली. नाम फाऊंडेशन सारख्या सुविख्यात संस्थेने दिलेले योगदान अतिशय मोलाचे आहे. शेतकरी संघटनेने सक्रीय सहभाग घेऊन प्रत्यक्ष सहयोग दिला. राजुरा येथिल फ्रेन्डस् स्पोर्टींग क्लब व सप्तरंग बहुउद्देशिय संस्थेनेही मोलाचे सहकार्य केले. संत-महात्म्यांनी दिलेल्या मानवतेची शिकवण या कार्यातून दिसून आली. तब्बल 1002 आदिम कुटूंबांच्या चुलीपर्यंत मदत पोहोचवून आपण सर्वांनी कोलाम सहाय्यता अभियान सफल करण्यात मोठे योगदान दिलेले आहात.

कठीण प्रसंगी गरजवंतांच्या मदतीला धावून जाण्याचे महत् कार्य या निमीत्ताने घडून आले.
हे कार्य एका महत्वाच्या टप्यापर्यंत पोहोचले असले तरी पुर्ण मात्र झालेले नाही. आणखीही बरेचश्या आदिम कुटूंबांना आपल्या मदतीची गरज आहे....


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.