चंद्रपुरात कोरोनाचा पहिला संशयित रुग्ण आढळल्याने शनिवारी सर्वत्र खळबळ उडाली. संशयितावर आयसोलेशन वॉर्डात उपचार सुरू असतानाच उपचारादरम्यान रुग्णाचा नागपूर येथील अहवाल चंद्रपुर शहरात सोशल मीडियावर वाऱ्यासारखे फिरले. आणि त्याची ओळख सार्वजनिक केल्या गेली. या प्रकरणाची चौकशी करावी, अशा मागणी चंद्रपूर मनपाचे माजी स्थायी समिती सभापती रामू तिवारी यांनी खबरबातच्या माध्यमातून जिल्हाप्रशानाकडे केली आहे.
रुग्णालयात कोरोना'च्या संशयित रुग्णावर आयसोलेशन वार्डात उपचार सुरू असतांना सोशल मीडियावर मीडियावर रुग्णाचा प्राथमिक तपासणीचा वैद्यकीय अहवाल सोशल मीडियावर व्हायरल करणे हि बाब निंदनीय असून रुग्णाची ओळख सार्वजनिक झाली असून त्यांच्या परिवाराला या कठीण प्रसंगी त्रास होत असेल तर अश्या बेजबाबदार व्यक्ति कर्मचारी व अधिकारी यांचेवर कारवाई करावी अशी मागणी रामू तिवारी यांनी खबरबातच्या माध्यमातून जिल्हाप्रशानाकडे केली आहे.
हे ही वाचा
चंद्रपूरच्या त्या पहिल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा अहवाल सोशल मीडियावर व्हायरल
आता या रुग्णाची ओळख सार्वजनिक झाली असल्याने परिवाराला व त्यांचा नातलगांना अडचणीचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करून सदर रुग्णाची ओळख सार्वजनिक करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर व कर्मचार्यांवर कारवाई करण्याची मागणी माजी मनपा स्थायी समिती सभापती रामू तिवारी यांनी केली आहे.