चंद्रपुर:-
शनिवारी रात्री चंद्रपुरात पहिला कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह असल्याची खात्रीशीर माहिती आली शुक्रवारी त्याच्या थ्रोटचा नमुना नागपूरला पाठवला होता. शनिवारी हा अहवाल पॉझिटिव्ह आला.
या रुग्णाची परिस्थिती सध्या प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे, मात्र तो ज्या सदनिकेत सुरक्षा रक्षकाचे काम करत होता त्या संपूर्ण सदनिकेत व परिसरात आता आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासन खबरदारीच्या उपाययोजना करणार आहेत.
या संपूर्ण सदनिकेत राहणाऱ्या सर्व परिवाराची आणि बाधित यांच्या परिवाराची व त्यांच्या संपर्कात येणाऱ्या लोकांची आता कोरोना चाचणी करण्यात येणार आहे.
हा परिसर म्हणजे चंद्रपूर शहरातील मूल मार्ग आहे. आणि मूल मार्गावरील हा संपूर्ण परिसर शनिवारी रात्रीच्या सुमारास जिल्हा प्रशासनाने सील केला व त्यावर आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे. या परिसरात सध्या कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
रिपोर्ट:पवन झबाडे/ललित लांजेवार