माजी जिल्हा परिषद सदस्य अविनाश जाधव यांची मागणी
राजुरा/ प्रतिनिधी
कोरोना विषाणूमुळे जगासमोर मोठे संकट निर्माण झाले आहे. देशात लाकडाऊन सुरू आहे. संपूर्ण व्यवहार ठप्प आहेत. मात्र रब्बी हंगामातील शेतकऱ्यांना आपले शेतमाल विकणे कठीण झालेले आहे. चाळीस ते पन्नास टक्के कापूस अजून शेतकर्यांच्या घरात आहे. काही दिवसात पुढील हंगाम सुरुवात होईल. शेतकऱ्यांच्या हातात बी-बियाणे, खते घेण्यासाठी आर्थिक जुळवाजुळव करणे गरजेचे आहे. अशा स्थितीत शासनाने शेतकऱ्याकडे असलेला कापूस हमीभावाने अधिकृत कापूस केंद्रावर खरेदी करण्यात यावा. यासाठी शासनाने तालुक्यातील सर्व जिनिंगवर शासकीय दराने कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य अविनाश जाधव यांनी केलेली आहे.
कोरोणामुळे संपूर्ण व्यवस्था कोलमडली आहे. कोरोना विषाणूला संसर्ग टाळण्यासाठी शासनाने कठोर पावले उचललेली आहेत. या लढाईत शेतकरी बांधवही साथ देत आहेत. रब्बी हंगाम संपल्यानंतर शेतातील शेतमाल विक्रीसाठी नेणे कठीण झालेले आहे आहे .संचार बंदी असल्यामुळे शहरांमध्ये दूध, भाजीपालाज्, फळे विक्री करणे ही यांना त्रासदायक ठरत आहे. याचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसलेला आहे. महिन्याभरातच खरीप हंगामाला सुरुवात होईल. यासाठी पैशाची जुळवाजुळव शेतकरी बांधव करीत आहे .कापूस अजूनही घरात असल्यामुळे अडचणीच्या काळात बेभाव खरेदी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याचा फटका शेतकऱ्यांना बसू शकतो पुढील हंगामासाठी शेतकऱ्यांना बी बियाणे खते खरेदी करण्यासाठी आर्थिक जुळवाजुळव करणे सुरू आहे या संकट काळात शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे होणे गरजेचे आहे अशा परिस्थितीत दुय्यम दर्जाचे बियाणे बाजारात येण्याची शक्यता नाकारता येत नाही यावर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाने कठोर पावले उचलावी. उत्तम प्रकारचे बियाणे शेतकऱ्यांना मिळेल या दृष्टीने व्यवस्था करण्यात यावी. जनावरांसाठी चाऱ्याची मोठी समस्या आहे. मात्र संचार बंदी असल्यामुळे शेतकऱ्यांना बाहेर कुठेही जाणे कठीण झालेले आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीने ही शेतकऱ्यांच्या हितासाठी योग्य निर्णय घ्यावे. कापूस खरेदीच्या दृष्टीने व व रब्बी शेतमाल खरेदीसाठी एकत्र गर्दी होऊ नये यासाठी दिवस निहाय गावे वाटून देण्यात यावेत त्यामुळे सोशल डिस्टन्स चे पालन होईल. शेतकऱ्यांनाही आधार मिळेल. शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी शासनाने आम्ही भावाने कापूस खरेदी केंद्र सुरू करावी अशी मागणी अविनाश जाधव यांनी केलेली आहे.