संजीव बडोले/नवेगावबांध.
दिनांक 18 एप्रिल 2020.
नवेगावबांध:-ग्रामपंचायत गौरनगर येथील सदस्य तथा ग्रामसुरक्षा दल मार्फ़त गावात कोरोना व्हायरस ची लागण होऊ नये, म्हणून येथील ग्रामपंचायत तथा ग्रामवासी यांनी आपल्या एकतेची मिसाल कायम ठेवत,प्रत्येक आठवड्यात सॅनिटाइझर ची फवारणी करून गाव सुरक्षित ठेवणे.
प्रत्येक कुटुंबाला डेटॉल साबून चे वाटप करणे.
ऑटो मधून भोंगा वाजवून जनजागृती करणे, कुणालाही घराबाहेर पडू न देणे, बाहेरील व्यक्ती ला गावबंदी करण्यात आली आहे. तसेच गावातील मजूर जे बाहेरगावी कामाला गेली होती.ते गावात परतले आहेत. त्यांना जिल्हा परिषद शाळा येथे क्वारंटटाईन करण्यात आले असून, गावा मार्फ़त त्यांना भोजनाची व्यवस्था करण्यात येत आहे.त्यांच्या व गावकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे. इतकेच नव्हे तर ग्रामपंचायत च्या गावातील महिला मास्क शिवून गावात वाटप करण्याचे कार्य जोमात चालू आहे. ह्या सर्व कार्यात योगदान बंधना अधिकारी सरपंच गौरनगर, श्री बिकासजी बैध्य उपसरपंच गौरनगर, संजय बिश्वास ,लतिका सरकार ,देवनाथ सरकार, बनिता मंडल, सनेका बैध्य, स्वरस्वती मंडल, व ग्रामवासी यांनी योगदान देत आहेत.