● जनावरे दगावण्याची भीती, शेतकऱ्यांना चिंता.
● शेकडो जनावरांना अज्ञानात रोगाची लक्षणे.
● तेलंगणा राज्यातून ही साथ रोग आल्याची प्राथमिक अंदाज.
Gadchiroli Frist News
तिरुपती चिटयाला
देशासह राज्यात कोरोनाच्या थैमान सुरू असताना सिरोंचा तालुक्यातील जनावरांमध्ये अज्ञान साथरोगाची लागण झाल्याने तालुक्यातील जनावरांचे पोट पुगणे,बैलाच्या शरीरावर जखम होणे,जनावराच्या पोटामध्ये गोळा तयार होणे अश्या अज्ञान साथ रोगामुळे मालकांना जनावरे दगविण्याची भीती निर्माण होत असल्याने तालुक्यातील शेतकरी व जनावर मालक चिंतेत पडले असून पशुपालकांना याचा फटका बसत आहे.
सिरोंचा तालुक्याला लागून असलेल्या तेलांगांतून ही अज्ञान साथरोग आल्याची अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आणि ही साथरोग तेलंगणा राज्यातील जनावरांमध्ये असल्याची माहिती पुढे येत आहे. आणि ही साथरोग गेल्या एक महिन्यापासून तेलंगणा राज्यातील जनावरांमध्ये असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
सिरोंचा तालुक्यातील नागरिकांची शेजारील तेलंगणा राज्याशी अनेक संबंध आहेत.यामध्ये प्रामुख्याने रोटी - बेटीचा नातं आहेत.तेलंगणा राज्य जवळ असल्याने तेलंगणा राज्यात जनावराचे मोठया प्रमाणात बाजार भरतो त्या बाजारातून आपल्या सिरोंचा तालुक्यातील पशुपालक आणि शेतकरी तेलंगणा राज्यातील बाजारातून दुधळू गाय आणि शेतीकामासाठी बैल जोडी खरेदी करून आणतात.जनावारांची खरेदी-विक्रीतून हा संसर्ग अज्ञान साथ रोगाची लागण झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. हजारो रुपये लावून खरेदी करून आणलेल्या गाय व बैल आणि आणलेल्या पशुकडून शेतकऱ्याकडे असलेल्या जनावरांना लागण होत असल्याने पशुपालक आणि शेतकरी चिंतेत पडले असून जनावराचे मृत्यू झाल्यास शेतकऱ्यांना मोठा आर्थिक नुकसान होणार आहे.
एकीकडे कोरोनाच्या संसर्ग होऊ नये म्हणून लाकडाऊन सुरू असताना सिरोंचा तालुक्यात जनावरांमध्ये अज्ञान साथरोगाचे तैमान सुरू झाली आहे.मात्र सिरोंचा तालुक्यात पशुधन विभागात अनेक रिक्त पदे असल्याने पशुधन विकास अधिकारी डॉ.अमोल गायकवाड,पशुधन विकास अधिकारी(विस्तार) डॉ. विकास घोडे हे दोन डॉक्टरानी कोरोनाला ना भिता आणि आपल्या जीवाची पर्वा न करता अज्ञान रोगावर मात करण्यासाठी दिवस रात्र जनावरांवर उपचार करत आहेत.तालुक्यांतील अनेक पशुवैद्यकीय दवाखान्यात अपुरे औषध आणि अनेक रिक्तपदामुळे जनावरांवर सेवा देण्यास पशुधन विभाग अपयशी ठरत आहे.
तालुक्यातील जनावरांमध्ये फसरलेल्या या अज्ञान साथरोगावर लवकरात लवकर औषधी आणून जनावरांना वाचविण्यात यावी अशी मागणी सिरोंचा तालुक्यातील शेतकरी व पशुपालकधारकानी करत आहेत.
*कोठ*
सर्व गावामध्ये शेतकऱ्यांना जनजागृती सुरू आहे. पुढील निदानासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविले असून, जनावराचे रक्तजल नमुने घेतले असून,उपचार सुरू आहे. अचूक निदान झाले नंतर उपचार करण्यास मदत होऊन पशुपालकान दिलासा मिळेल.
*डॉ.अमोल गायकवाड*
*पशुधन विकास अधिकारी*
*(वर्ग 1)* *सिरोंचा*
*कोठ*
या अज्ञान साथरोग बद्दल वरिष्ठ कार्यालयाला कळविले असून रक्तजल नमुने तपासून आल्यावर अतिरिक्त औषध व मनुष्यबळ (तांत्रिक) मागणी केली आहे.
*डॉ.विकास घोडे*
*पशुधन विकास अधिकारी(विस्तार)*
*पंचयत समिती सिरोंचा*