चंद्रपूर/प्रतिनिधी:
चंद्रपूर जिल्ह्याची पुढील ५० वर्षांची पाणीपुरवठा मागणी लक्षात घेऊन केंद्र सरकार, राज्य शासन आणि महानगरपालिका प्रशासनाच्या पुढाकारातून अमृत अभियानाअंतर्गत स्वयंचलित पाणीपुरवठा योजना शहरात उभारण्यात येत आहे.
संपूर्ण शहरात नवीन पाईपलाईनचे जाळे उभारण्यात येत असून याअंतर्गत केले जाणारी विविध कामे ही आता अंतिम टप्यात आहेत. मात्र कोरोनाच्या पार्श्वभुमीवर मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे अमृतचे काम बंद होते. आता उन्हाळ्यात चंद्रपूरकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये यासाठी उपाययोजना म्हणून चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे अमृत योजनेचे काम पुन्हा सुरू करण्यात आले आहे.
केंद्र सरकारने अमृत योजनेसाठी चंद्रपूर शहराचा समावेश केला. त्यानंतर चंद्रपूर शहरात अमृत योजनेचे काम सुरू करण्यात आले होते. आतापर्यंत पाण्याची टाकी नवीन पाईपलाईन टाकण्याची कामे पूर्ण झाले आहेत मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या प्रतिबंधासाठी करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे अमृतचे काम थांबविण्यात आले होते.
मात्र, आता उन्हाळा झाला असल्याने भासु नये यासाठी अमृत योजनेची सद्यस्थिती, पाणी पुरवठ्याची सद्यस्थिती, उन्हाळ्यातील पाणीपुरवठ्याची स्थिती, टाक्यांबाबतची माहिती,२४ बाय ७ ची सद्यस्थिती व विस्तारीकरण याबाबत कामांचा आढावा घेऊन व आयुक्त राजेश मोहिते यांच्याशी चर्चा करून अमृत योजना पुन्हा पुर्ववत सुरू करण्याचे निर्देश महापौर सौ. राखी कंचर्लावार यांनी दिले आहेत.
सध्या जटपुरा ते महाकाली मंदिर अशा मोठ्या लाइनचे काम सुरू करण्यात आले आहे. तसेच तुकुम, बालाजी वॉर्डातही कामे सुरू करण्यात आली आहे.. अमृत योजना लवकरच पूर्ण करून चंद्रपूर शहरातील पाणीटंचाईची समस्या कायम निकाली काढण्याचा मनपाचा प्रयत्न आहे.