खबरबात प्रतिनिधी-
अकोले(सांगवी)
विष्णु तळपाडे.
जागतिक महिला दिन सर्वत्र अतिशय उत्साहाने संपन्न होत असताना खानापुर ता.अकोले.जि.अहमदनगर या ठिकाणी अतिशय निर्दयी घटना घडलेली आहे.कु.देऊबाई पांडु गिर्हे वय25 वर्षे ह्या आदिवासी तरुणीचा निर्दयीपणे खुन झालेली बाँडी मिळुन आली.रविवारी 8मार्च रोजी ठिक6:30वा.तिच्यावर अतिशय शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.यामुलीस चार बहिणी ,दोन भाऊ,आई असा परिवार आहे.
या युवतीचे वडील पांडु गिऱ्हे हेआता ह्यात नाहीत परंतु ते10वर्ष गर्दणी,ता.अकोले यागृप ग्रामपंचायतमध्ये सद्स्य होते.ही मुलगी कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी शेळ्या चारण्याचे काम करत असे,तिच्यावर बळजबरीकरत तिला जीवे मरण्यात आलेले आहे.
पोलिस प्रशासन निष्काळजी पणे आपला पुढील तपास करत आहे.तरी लवकरात लवकर या आदिवासी युवतीस न्याय मिळाला पाहिजे,आशी भावना समस्त गावकरी वआदिवासी बांधवानी व्यक्त केली आहे.
ही मुलगी आदिवासी असल्यामुळे पोलिस निरिक्षक अरविंद जोधळे हे उडवा उडवी चे उत्तर देऊन हा गंभीर विषय टाळायचा प्रयत्न करत आहेत,त्यामुळे ह्या मुलीला न्याय मिळुन देण्यासाठी तत्काळ आरोपीला अटक करुन फाशीची सजा मिळावी म्हणून अकोले पोलिस स्टेशनचे निष्काळजी पणे काम करणारे पो.निरीक्षक जोंधळे व तहसीलदार कांबळे यांना जाब विचारण्यासाठी व निषेध करण्यासाठी बुधवार दि.11 मार्च 2020 रोजी सकाळी ठिक 10:00वाजताअकोले पोलिस ठाणे येथे सर्व आदिवासी बांधवानी आपल्या बहिणीला न्याय मिळुन देण्यासाठी उपस्थित रहावे असे अव्हान अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेले आहे.