Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, मार्च २७, २०२०

मिरची मजुरांनी मानले पारोमिता गोस्वामी यांचे आभार




चंद्रपूर,दि.27 मार्च : जगभरात धुमाकूळ घातलेल्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने देशभरात लॉकडाऊन जाहीर केला आहे.कोरोना रोगाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रवासावरही अटी लावण्यात आल्या आहेत.यामुळे मूळचे चंद्रपूर जिल्ह्यातील जे मजूर तेलंगणा राज्यात अडकले आहेत अशा मजुरांना परत आणण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल आम आदमी पार्टी च्या नेत्या अॅङ पारोमिता गोस्वामी यांचे आभार मानण्यात आले. दरम्यान आज गोस्वामी यांनी फेसबूक लाइव्ह च्या माध्यमातून संवाद ही समस्या पुढे आणली.




ब्रम्हपुरी, सावली, सिंदेवाही, या तालुक्यांसह चंद्रपूर जिल्ह्यातील किमान 10 हजार मजूर तेलंगणा राज्यातील विविध गावात मिरची तोडण्याच्या मजुरीसाठी गेले असता अचानक लागू झालेल्या लॉक डाऊनमुळे तेलंगना राज्यात अडकून पडले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अचानक जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे वाहतूक व्यवस्था ठप्प झाली. यामुळे या मजुरांना स्वगृही परतण्यासाठी कोणताही मार्ग उपलब्ध नसून यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याची माहीती मजुरांनी पारोमिता गोस्वामी यांना दिली.
त्यानंतर गोस्वामी यांनी सकाळपासून फोनवर मजूर बांधव संपर्क साधत आहेत. कोठेगुड्डम आणि खम्माम जिल्ह्यात शेकडो मजूर अडकले आहेत. महाराष्ट्र आणि तेलंगणा सरकारने आपसात बोलून या बांधवांना अन्न धान्य, पाणी, किराणा व राहण्याची सोय करून दिली पाहिजे. सुखरूप घरी पोहचेपर्यंत काळजी घेतली पाहिजे.
Inter state migrant labour साठी action plan लवकरात लवकर जाहीर करायलाच पाहिजे.
खाली सामदा, तालुका सावली येथील बांधवांची फोटो आहे. ते कोठेगुड्डम जिल्ह्यात अडकले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी यांच्याशी दूरध्वणीवरून संपर्क साधून तेलंगणात अडकलेल्या सर्व मजुरांना स्वगृही आणण्याची तसेच या मजुरांना आहे त्याठिकाणी राहण्याची, भोजनाची व्यवस्था उपलब्ध करून देण्याची विनंती केली.

मजुरांच्या सुरक्षिततेसाठी तेलंगणा प्रशासनाशी सतत संपर्क साधला जात आहे. खुद्द गोस्वामी लक्ष ठेऊन दररोज माहिती घेत आहेत. ताईनी एका हाकेला दिलेल्या प्रतिसादाबद्दल मजूर लोकांनी आभार मानले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.