ट्रक मध्ये ५० चालक व क्लिनरचा समावेश
नागपूर: अरुण कराळे :
देशात सर्वत्र संचारबंदी असतांना नागपूर तालुक्यातील पोलीस स्टेशन वाडी अंतर्गत येणाऱ्या वडधामना येथुन प्रतापगड येथे जाणाऱ्या ट्रकला शनिवार २८ मार्च रोजी पोलिसांनी आपल्या ताब्यात घेऊन मोठी कामगिरी बजावली आहे.संचारबंदी असल्याने काम नाही व खिशातले संपूर्ण पैसे संपले असल्याने आता खायचे का त्यापेक्षा गावी जाने योग्य असल्याचे समजत निघालेल्या ५० चालक व क्लिनर पोलिसांनी अडविले.
प्राप्त माहितीनुसार ट्रक क्रमांक एमएच ४० एके ५२६७ हा दुपारच्या दरम्यान वडधामना येथून५० चालक व क्लिनर यांना घेऊन प्रतापगड (उत्तर प्रदेश) राज्यात रवाना होत होता. पोलिसांना माहिती मिळताच ट्रक अडविला असता ट्रकमध्ये जाणारे चालकासह ५० युवकांना ताब्यात घेतले.
ही कामगिरी वाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाठक,दुय्यम पोलीस निरीक्षक दीपक पाटील,सहाय्यक निरीक्षक अमोल लाकडे,प्रशांत देशमुख,महेंद्र सडमाके, जितेंद्र दुबे,सुधाकर उईके,दिलीप आडे आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी केली असून पुढील तपास वाडी पोलीस करीत आहे.
याविषयी ट्रान्सपोर्ट व्यावसायीक महेंद्र शर्मा यांना विचारले असता त्यांनी सांगीतले की शासन विरोधी काम करणाऱ्या ट्रक चालकांना कदापीही मदत करणार नाही .हे केलेले कृत्य निंदनीय आहे .