Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, मार्च २८, २०२०

नाते आपुलकीचे संस्थेतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीस ३१ हजारांची मदत

कोरोनाग्रस्त : जिल्हाधिकारी यांना धनादेश सुपूर्द
चंद्रपूर : 
देशात कोरोनाचा प्रभाव वाढतच चालला आहे. त्यात कोरोनाग्रस्तांची संख्या महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. त्यामुळे देशात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. ही गंभीर परिस्थिती हाताळण्यासाठी शासनाला निधीचा अभाव खूप मोठ्या प्रमाणात जाणवणार आहे. हीच गंभीर बाब लक्षात घेऊन नाते आपुलकीचे बहु. संस्थेने एक पाऊल देशहितासाठी टाकत संस्थेमार्फत ३१ हजारांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीस जिल्हाधिकारी डॉ कुणाल खेमनार यांना शनिवारी (ता. २८) सुपूर्द करण्यात आला. 

नाते आपुलकीचे बहु. संस्था शिक्षण व आरोग्य या क्षेत्रात काम करते. आजवर अनेक समस्याग्रस्त रुग्णांना संस्थेने मदत केली आहे. सध्या कोरोनाचा प्रभाव वाढत चालल्याने त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी आरोग्य यंत्रणांसह सर्व सरकारी यंत्रणा कामाला लागल्या आहेत. सरकारने आपल्या परीने योग्य पाऊले उचलून राज्यात व देशात संचारबंदी लागू केलेली आहे. या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी सरकारच्या तिजोरीवर मोठा ताण पडणार आहे. 

सरकारने आपल्या परीने कितीही प्रयत्न केले तरी मानवतेच्या दृष्टीने आपलेही काही कर्तव्ये आहे, हाच मुळ उद्देश डोळ्यासमोर ठेवून सीएम रिलीफ फंडसाठी निधी गोळा करण्याची मोहीम नाते आपुलकीचे बहु. संस्थेने सर्वप्रथम हाती घेतली. संस्थेत जिल्हा, राज्य तसेच विदेशातील लोक या संस्थेत सदस्य आहेत. सर्व सदस्यांनी आपल्या इच्छाशक्तीनुसार निधी जमा करीत आहेत. आतापर्यंत १००च्या वर सदस्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी निधी जमा केला असून तो ओघ सुरूच आहे. आपल्या संस्थेच्या माध्यमातून जो काही निधी गोळा होईल तो जिल्हाधिकारी यांच्यामार्फ़त मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्यात येईल, असे ठरविल्याप्रमाणे आज शनिवारी जिल्हाधिकारी डॉ कुणाल खेमनार यांना ३१ हजारांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. संस्थेच्या या कार्याचे मान. जिल्हाधिकारी यांनी कौतुक केले. तसेच सामाजिक संस्थेने पुढे येऊन मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले.

धनादेश देतांना संस्थेचे सदस्य प्रमोद उरकुडे, जयंत देठे, जितेंद्र मशारकर, हितेश गोहोकार उपस्थित होते.तसेच कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी जे कोणी इच्छुक असेल त्यांनी आपल्या परीने मदत अकाऊंट नं. ३०२६५५१२९९१ (जयंत देठे), आयएफएससी कोड एसबीआयएन०००४७११ किंवा गुगल पे नं. ९८९०३३१८१५ यावर पाठव शकता. ती मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्यात येईल.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.