Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, फेब्रुवारी ११, २०२०

पुरोगामीचे बेमुदत साखळी उपोषण

आज दुसरा दिवस- शिक्षकांच्या प्रलंबित समस्या
माजी शिक्षक आमदार डायगव्हाणे यांची भेट
चंद्रपूर- 
         जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या समस्या मागील वर्षभरापासून प्रलंबित आहेत, या समस्यांच्या सोडवणुकीसाठी महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने जिल्हा परिषद चंद्रपूर समोर 10 फेब्रुवारी पासून बेमुदत साखळी उपोषण सुरू आहे आज आंदोलनाचा दुसरा दिवस. आज आंदोलन मंडपाला मा.विश्वनाथ डायगव्हाणे माजी शिक्षक आमदार नागपूर विभाग, मा.सुधाकर अडबाले सरकार्यवाह विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ यांनी भेट देऊन समस्या जाणून घेतल्या.

       आज पुरोगामी च्या चिमूर तालुका शाखेच्या वतीने ताराचंद दडमल, गोविंदा गोहणे, गोवर्धन ढोक, जनार्धन केदार, ज्ञानेश्वर सिडाम, चुडामन मुळे, महादेव शेडामे, अरुण चौधरी, सरोज चौधरी हे शिक्षक आंदोलनाला बसले आहेत.

       कालपासून आंदोलन सुरू आहे मात्र अजूनही त्याची दखल प्रशासनाने घेतली नाही, यापूर्वीही प्रशासनाने संघटना प्रतिनिधींना चर्चेला न बोलावता फक्त समस्या सोडवू असेच आश्वासन दिले त्यामुळे आधी एक दिवसीय धरणे आंदोलन व आता साखळी उपोषण करण्यात येत आहे.    

      आदिवासी भागातील शिक्षकांना एकस्तर वेतनश्रेणी, पदवीधर शिक्षकांची वरिष्ठ वेतन श्रेणी, प्राथमिक शिक्षकांना वरिष्ठ वेतन श्रेणी तसेच प्राथमिक शिक्षक व पदवीधर शिक्षकाना निवड श्रेणी, सेवापुस्तक पडताळणी करावी, मेडिकल, जिपीएफ प्रस्तावास कालमर्यादा निश्चित करणे, 2014 च्या बिएस्सी नियुक्त शिक्षकांना वेतनश्रेणी, डीसिपीएस कपातीच्या हिशोबासह पावत्या द्याव्या, प्रशिक्षणे कमी करावी, विस्तार अधिकारी व मुख्याध्यापक पदोन्नती तात्काळ करावी,  शिक्षक समायोजन तात्काळ करावे, शालार्थ वेतन प्रणाली अंतर्गत शाळांकडून हार्ड कापी मागू नये या समस्यांना घेऊन हे आंदोलन करण्यात येत आहे, आंदोलनाचे नेतृत्व विजय भोगेकर, हरीश ससनकर, अल्का ठाकरे, रवी सोयाम, निखिल तांबोळी हे पदाधिकारी करत आहेत उद्या भद्रावती तालुक्यातील शिक्षक उपोषणाला बसणार आहेत.

        हरीश ससनकर
       जिल्हा कार्याध्यक्ष

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.