Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, फेब्रुवारी ११, २०२०

फिनिक्स आयटीआय पदविकाधारक विद्यार्थी ,बेरोजगार , कामगार संघटना ची उद्या चंद्रपूर जिल्हा बैठक

चंद्रपूर/प्रतिनिधी:

ITI विद्यार्थ्यांच्या  प्रगतीसाठी व विद्यार्थ्यांना येणाऱ्या समस्यांवर विचारविनिमय करण्यासाठी  शासकीय विश्रामगृह वरोरा नाका चंद्रपूर येथे उद्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

  महाराष्ट्र राज्यातील सर्व आयटीआय पदविकाधारक, विद्यार्थी, बेरोजगार तरुणांना एकत्र करून त्यांच्या समस्या सोडवुन त्यांना न्याय देण्यासाठी फिनिक्स औद्योगिक प्रशिक्षित विद्यार्थी बेरोजगार  कामगार संघटना सदैव तत्पर आहे. या संघटनेचे विस्तार संपुर्ण महाराष्ट्रात करायचा असुन महारष्ट्रातील सर्व आयटीआय पदविकाधारक विद्यार्थी, कामगार मित्रांनो महाराष्ट्रातील सरकार व विविध कंपन्या आयटीआय पदविकाधारक कामगारांची आर्थिक पिळवणूक करीत आहेत  याला रोखण्यासाठी आयटीआय पदविकाधारक बेरोजगार विद्यार्थी कामगारांचे प्रश्न सोडवुन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी फिनिक्स औद्योगिक प्रशिक्षित बेरोजगार, विद्यार्थी, कामगार संघटना सदैव तत्पर आहे. 

संघटनेची चंद्रपूर जिल्हा बैठक उद्या  दिनांक १२ फेब्रु. २०२० ला दुपारी १२ वाजता शासकीय विश्रामगृह वरोरा नाका येथे असुन  चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व आयटीआय पदविकाधारक बेरोजगार विद्यार्थी मित्रांनी हजर राहावे. असे आवाहन अविनाश वाळके यांनी केले आहे. याकरिता खालील नंबर वर संपर्क करावा.  📲 9730045385

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.