Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, जानेवारी ०४, २०२०

पाथरी येथे राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांची पुण्यतिथी



पाथरी : - अखिल भारतीय श्री गुरूदेव सेवा मंडळ पाथरी व्दारा वंदनिय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या 51 व्या पुण्यतिथी तथा सावित्रीबाई जयंती आणी सर्व स्मृतीदिन महोत्सव पाथरी येथे पार पाडण्यात आला . या तिन दिवसीय कार्यकमात दररोज सकाळला ग्राम सफाई सामुदाईक ध्यान , सामुदाईक प्राथना घेण्यात आली बुधवार रोजी ह . भ . प . चेतन ठाकरे महाराज यांचे प्रबोधात्मक कार्यकम घेण्यात आले . गुरूवार रोजी सु . श्री कविताताई येनुरकर यांचे किर्तन घेण्यात आले व शुकवार रोजी सकाळला वंदनिय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांची पालखी व मिरवणुक काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये सर्वधर्मीय गावकरी बांधव व शाळकरी मुले , मुलीनी मोठया संख्येने उपस्थिती दर्शविला या मिरवणुकीमध्ये हनुमानच्या रूपात वेशभुषा केलेले विशेष आकर्शक ठरलेले होते त्यानंतर गोपालकाला व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या उत्सहादरम्यान रमेश पा . ठिकरे , तुकाराम ठिकरे , राजेश सिध्दम , नरेश नैताम , रत्नाकर मेश्राम , राजेन्द्र अि ढया , अशोक सुरपाम , सुरेन्द्र डोंगरवार , राजु सुरपाम , दिलीप ठिकरे , श्रीधर ठिकरे , उध्दव बोरकर , युदिष्ठर ठिकरे , मधुकर चचाणे , आनंदराव धारणे व समस्त अखिल भारतीय गुरूदेव सेवा मंडळ पाथरी यांनी कार्यकमाच्या यशस्वीसाठी मोलाचा वाटा उचलला. 

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.