जिल्ह्यातील औद्योंगीदृष्ट्या संपन्न असलेल्या घुग्घूसला नगर परिषदेचा दर्जा देण्याची मागणी गेल्या काही वर्षांपासून सातत्याने केली जात होती.
मात्र भाजप सरकारने आपल्या राजकीय ङ्कायद्यासाठी या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले होते. राज्यांत सत्तांतर झाले, महाआघाडीचे सरकार आले. यामुळे भाजपसरकारच्या काळात रखडलेले सर्वच प्रकल्प मार्गी लावण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहे. घुग्घूसला नगर परिषदेच्या दर्जां देण्याची मागणी जुनी होती.
ही मगणी पूर्ण करण्याची मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी जिल्हा नियोजन बैठकीत पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे केली. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी ही मागणी अत्यंत महत्वाची असून ती पूर्णत्वास नेण्याची विनंती पालकमंत्री वडेट्टीवार यांना केली.