Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, जानेवारी २८, २०२०

शेळीपालन,दुग्धव्यवसाय व कुक्कुटपालन प्रशिक्षण

 चंद्रपूर/प्रतिनिधी:
महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र चंद्रपूर द्वारे 7 वी पास व 18 वर्षे पूर्ण असलेल्या युवक-युवतींकरिता 6 फेब्रुवारी ते 24 फेब्रुवारी 2020 या 2 आठवडे कालावधीचे शेळीपालन, दुग्धव्यवसाय व कुक्कुटपालन प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे.

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र ही उद्योग संचालनालय अंतर्गत कार्यरत महाराष्ट्र शासन पुरस्कृत स्वायत प्रशिक्षण संस्था असून या संस्थेचा मुख्य उद्देश विविध प्रकारचे प्रशिक्षण आयोजित करून जास्तीत जास्त लोकांना स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करण्याकरिता प्रेरित करणे व उद्योजकतेला पूरक असे वातावरण निर्माण करणे हा आहे.
सदर प्रशिक्षणामध्ये शेडची रचना, व्यवसायाचे फायदे, शेळी, गाय व कोबडयांची विविध जाती, पैदास, निवड, प्रजनन, औषधोपचार, लसीकरण, निगा व संरक्षण प्रतीबंधक उपाय त्यांचे संगोपन व व्यवस्थापन, संतुलीत आहार, जिवनसत्वाचे महत्व, संसर्गजन्य रोग व त्यावर उपचार तसेच शासनाच्या विविध अनुदानित योजना, उद्योजकीय व्यक्तीमत्व विकास, यशस्वी उद्योजक यांचे मार्गदर्शन, कर्ज प्रकरण तयार करण्याचे मार्गदर्शन, पशुधन विकास कार्यालयाच्या योजना व व्यवसाय संधी इत्यादी विषयांवर विशेष तज्ञ व शासकिय अधिकारी वर्गाद्ववारे मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

या प्रशिक्षणात प्रवेश घेण्याकरिता इच्छुक युवक-युवतींनी त्वरित दिनांक 5 फेब्रुवारी 2020 पर्यंत महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, उद्योग भवन, दुसरा माळा, गाळा क्रमांक 208, बस स्टॉप समोर, रेल्वे स्टेशन रोड, चंद्रपूर येथे स्वतःचा बायोडाटा, शाळा सोडल्याचा दाखला, गुणपत्रिका, आधार कार्ड व दोन पासपोर्ट साईज फोटो घेऊन हजर राहावे. अधिक माहितीसाठी प्रकल्प अधिकारी के.व्ही.राठोड (मो.9403078773) , 07172-274416 व कार्यक्रम आयोजक मिलिंद कुंभारे (मो. 9011667717), दिपाली जाजुर्ले (मो. 9860600301) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.