चंद्रपूर /ललित लांजेवार:
राजुरा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या एका पोलिस शिपायाने विष प्राशन करून आत्महत्या केली. मंगेश जक्कुलवार असे मृत पोलिस शिपायाचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. २७) सकाळी अकरा वाजताच्या सुमारास उजेडात आली.
राजुरा- बामणी रेल्वे उडाण पुलाखाली त्यांनी विष घेऊन आत्महत्या केली. या मार्गाने ये-जा करणाèयांनी याची माहिती राजुरा पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले.
मंगेश जक्कुलवार हे मूळचे चंद्रपूरचे. मागील वर्षापासून राजुरा पोलिस स्टेशनला बदली होऊन आले होते. अतिशय साधा स्वभावाचा, सर्व कर्मचाऱ्याचे ते आवडते होते. पोलिस स्थापनादिनाच्या दिवशी त्यांनी विद्याथ्र्यांना शस्त्राची माहिती दिली होती.
मृत पोलिसाचे वडील देखील पोलिसात असल्याची माहिती आहे, मात्र सर्वांचा चाहता असलेला मंगेशने अचानक आत्महत्या का केली असावी? हे मात्र तपासानंतर स्पष्ट होणार आहे.