नागपूर ०७ :नागपूर मेट्रो रेल प्रकल्पांचे कार्य जलद गतीने सुरू असून महा मेट्रोद्वारे अनेक ठिकाणी विविध उपक्रम राबविले जात आहे,याच उपक्रमामध्ये एक अनोखा उपक्रम ट्रॅकचे निर्माण कार्य करतांना देखील राबविल्या गेले आहे. महा मेट्रोद्वारे ट्रॅकचे निर्माण कार्य करतांना ऍपीट्रॅक तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात आला आहे.
या टेक्नॉलॉजीमुळे कार्य जलद गतीने होण्यास महा मेट्रोलला मदत मिळत आहे. "ऍपीट्रॅक टेक्नॉलॉजी" चा उपयोग बलास्टलेस ट्रॅक मध्ये केल्या जातो. व्हायाडक्टच्या नवीन कॉंक्रीटमध्ये ट्रॅकलेइंग मशीनच्या साह्याने बेसप्लेट आणि डॉवेल्स सहजपणे बसविल्या जात असून ट्रॅक लेईगचे कार्य लवकर पूर्ण होण्यास मदत मिळते.या टेक्नॉलॉजीच्या वापरामुळे वायाडक्ट किंवा जमीनी मार्गावर दर-रोज २०० मीटर ट्रॅक तयार केल्या जाऊ शकतो. ऍपीट्रॅक टेक्नॉलॉजीच्या उपयोगामुळे पारंपरिक पद्धतीपेक्षा कामाची गती दुप्पट असते.
*ऍपीट्रॅक टेक्नॉलॉजीच्या वापरामुळे विविध प्रकारचे फायदे होतात जे कि,पुढील प्रमाणे :*
• या टेक्नॉलॉजीच्या वापरामुळे वायाडक्ट किंवा जमीनी मार्गावर दर-रोज २०० मीटर ट्रॅक तयार केल्या जाऊ शकतो.
• ट्रॅक टाकण्याच्या विशिष्ट पद्धतीमुळे कुठलेही कार्य शिल्लक राहत असून,साफ-सफाईची आवश्यकता नसते कास्टिंग पूर्ण झाल्यावर ७५% ट्रॅक तयार असतो.
• सहज आणि स्वयंचलित बांधकाम कार्यामुळे कार्यस्थळ स्वच्छ आणि कर्मचाऱ्याचे आरोग्य आणि सुरक्षा देखील कायम राहते.