चंद्रपूर- महाऔष्णीक विज निर्मीती केंद्रात कधीकाळी मुक्कामी येवू शकणा-या अधिका-याकरिता येथे हिराई गेस्ट हाऊस ची व्यवस्था आहे.
विविध बोगस कंत्राटातून विज निर्मीती केंद्रातील अधिकारी आणी कंत्राटदार जरी मालामाल होत असले तरी, महागड्या विज दराने महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनता मात्र कंगाल होत चालली आहे, असा आरोप जाणता राजा पक्षाचे नितिन उदार यांनी केला आहे.
त्या गेस्ट हाऊस मेन्टनन्स करीता येथील टेक्नीकल सेक्शन च्या अभीयंत्याकडुन काढण्यात आलेले कंत्राट आणी त्या कंत्राटाची महाप्रचंड रक्कम तर चक्रावून टाकणारी अशीच आहे.
एकीकडे मुख्यमंत्र्यापासुन ते राज्यपालांच्या विश्रांती करीता सार्वजनीक बांधकाम विभागाकडून चंद्रपुर येथे शासकीय विश्रांतीगृहाची व्यवस्था आहे. प्रचंड राबता असूनही ज्याच्या मेन्टनन्स करीता कंत्राटात केवळ १५ कामगार आणी दर महिना खर्च केवळ दोन लाख रुपये रकमेत होत आहे.
चंद्रपुर महाऔष्णीक विज निर्मीती केंद्रातील अभीयंत्याकडुन "हीराई गेस्ट हाऊस" मेन्टनन्स बाबत बनविलेल्या या बनवाबनवीच्या कंत्राटाचा अभ्यास केल्यास, येथील अभीयंते इस्टीमेट फुगवुन विविध कंत्राटात करीत असलेला महाभ्रष्ट्राचार आणी त्यातुन होणारी प्रचंड उधळपट्टी याचा सहजपणे अंदाज येवु शकतो.