स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली रंगेहात अटक
चंद्रपूर:- जिल्हा परिषदेच्या,बांधकाम विभागातील आस्थापना येथील अमरप्रेम जुमडे ,जेष्ठ साह्यक या लिपीकाला तीन हजार रुपयांची लाच घेताना केली अटक, सदर कारवाई ही चंद्रपूर अँटी करप्शननी केली असून ,अधिक तपास सुरू आहे.
०४.१२.२०१९ ला दुपारी चार वाजताच्या दरम्यान असरप्रेम भाविकदास जुमडे , जेष्ठ सहाय्यक बांधकाम विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळयात रंगेहात अटक करण्यात आली आहे.
तक्रारदार हे चंद्रपूर येथील रहीवासी असून तक्रारदार याने सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित निवृत्तीवेतन काढण्याचा प्रस्ताव तयार करण्याच्या कामाकरीता अमरप्रेम भाविकदास जुमडे, जेष्ठ सहाय्यक यानी लाच म्हणून तक्रारदार याचेकडे ३,०००/-रु. मागणी केली. तक्रारदार यांची लाच देण्याची मुळीच ईच्छा नसल्याने त्याचे विरुध्द ला.प्र.वि कार्यालय येथे तक्रार दिली होती.
प्राप्त तक्रारीवरून आज दिनांक ०४.१२.२०१९ रोजी केलेल्या पडताळणी कार्यवाही मध्ये ३.०००/-रु. लाचेची मागणी स्पष्ट झाल्याने बांधकाम विभाग जिल्हा परीषद चंद्रपूर येथे सापळा कार्यवाही दरम्यान आरोपी अमरप्रेम भाविकदास जुमडे वय ४६ वष, जेष्ठ सहाय्यक बांधकाम विभाग,जिल्हा परीषद चंद्रपूर यांना ३,०००/-रु.लाचरक्कम स्विकारल्याने त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले असुन पुढील तपास कार्य सुरु आहे.
सदरची कार्यवाई ही श्रीमती रश्मी नांदेडकर,पोलीस उपायुक्त/पोलीस अधिक्षक, ला प्र वि नागपुरश्री दुलवार, अपर पोलीस अधिक्षक लाचलुचपत विभाग नागपूर, तसेच पोलीस उपअधिक्षक श्री आविनाश भामरे लाचलुचपत विभाग चंदपुर यांचे मार्गदर्शनात निलेश सुरडकर, पोलीस निरीक्षक वैशाली ढाले पोलीस निरीक्षक तसेच कार्यालयीन स्टॉफ पोलिस हवाल दार मनोहर ऐकोणकर, सतोष येलपूलवार, संदेश वाममारे नरेश नलायरे, रोशन चांदेकर, राखी हेगळे, समिक्षा भोंगळे व चालक राहुल ठाकरे यानी यशस्वी पार पाडली आहे.