चंद्रपूर/ ललित लांजेवार:
आता पर्यंत तुम्ही गाडी,सोन,पैसे,विहीर चोरीच्या तक्रारी ऐकल्या असतील किव्हा बघितल्या असतील मात्र चंद्रपूर शहरात चक्क नालीच चोरीला गेल्याची बाब पुढे आली आहे,या नाली चोरीची तक्रार देखील रामनगर पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आली आहे.
चंद्रपुरात फेब्रुवारी २०१९ ला तत्कालीन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विशेष अर्थसाह्यता निधी २०१७-१८ अंतर्गत मिळालेल्या निधीतून चंद्रपूर शहरतील प्रभाग क्रमांक १३ नगीनाबाग येथील विदर्भ हाउसिंग सोसायटी परिसरात १२ लाख ५० रुपये किमतीच्या रोडचे, नालीचे व पेवर्स बसविण्याचे बांधकाम करायचे होते,या परिसरात रोडचे व पेवर्स बसविण्याच काम तर पूर्ण झाले मात्र बांधकाम विभागाच्या अनपढ इंजिनिअर्स व अधिकाऱ्यांनी मात्र आपली पाठ थोपटविण्याच्या नादात आपल्या सोबत आपल्या विभागाचाही भोंगळ कारभार देखिल चंद्रपूर करांपुढे आणला, ज्या ठिकाणी नाली बांधलीच नाही त्या ठिकाणी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी रोड,नाली व पेवर्स बांधकामाचा उल्लेख भविष्याच्या तारखे सोबत केला आहे.
मात्र बांधकाम विभागाच्या मार्फत लावण्यात आलेल्या तपशील बोर्डात केलेल्या उल्लेखात व वस्तू स्थितत त्या ठिकाणी नालीच नसल्याचे आढळून आले, त्यामुळे आता विदर्भ हाउसिंग सोसायटीच्या रहिवाश्यांना ठेकेदाराणे लॉलीपोप दिला कि बांधकाम विभागाने लॉलीपोप दिला हे समजायला मार्गच उरला नाही.
नाली चोरीची तक्रार पोलीस ठाण्यात पोहचताच रामनगर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी देखील अचंबित झाले,त्यांना देखील या तक्रारीची कोणत्या आशयाखाली नोंद घ्यावी हेच कळेना, मात्र वरिष्ठ अधिकारी यांनी हि लेखी तक्रार घेत तक्रारदार सुनील तीवारी यांना या कामात झालेल्या गैरव्यवहारा बद्द्ल संपूर्ण चौकशी करून सत्य उघड करण्याचे आश्वासन दिले, त्यामुळे आता पोलीस विभाग बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची
अशी व कोणत्या पद्धतीने चौकशी करतात ह्याकडे सर्वांचे लक्ष लागले राहणार आहे.
पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विशेष अर्थसाह्यता निधी २०१७-१८ अंतर्गत मिळालेल्या निधीतून साखरवाहीच्या कवीश्वर नांदे या कंत्राटदाराला याचे बांधकाम करण्याचे काम मिळाले होते,या कामाची किंमत १२ लाख ५० रुपये इतकी होती, तर या कामाचा कालवधी हा भविष्याचा कालवधी दाखविण्यात आला,जो डिसेंबर महिना अजून यायला १५ ते २० दिवस बाकी आहे, असा डिसेंबर महिन्याला कामाची सुरवात दाखविण्यात आली असून ५.१२.२०१९ या दिवशी काम सुरु झाल्याची तारीख दाखविण्यात आली आहे.तर १६.०९.२०१९ या दिवशी काम पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले.आहे मात्र ५ डिसेंबर २०१९ यायच्या आधीच बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तारखा चुकवत महाराष्ट्र शासनाच्या बोर्डवर आपल्या हुशारकीचा परिचय दाखवून दिला,या हुशार अधिकाऱ्यांना प्रोजेक्टची माहितीचा तपशील लावायसाठी इतकी घाई का झाली असावी ? असा प्रश्न विदर्भ हाउसिंग सोसायटीच्या रहिवाश्यांना पडला आहे.या संपूर्ण प्रकाराकडे स्थानिक नगरसेवकांनी मात्र मूग गिळून चूप बसनेच योग्य समजले आहे,तर नगरसेवक आमच्या प्रभागाकडे लक्ष देत नाहीत असे देखील प्रभागातील नागरिक म्हणतात