देसाईगंज दि ५
गडचिरोली जिल्ह्यातील सर्वात पहिली नगर परिषद असलेल्या देसाईगंज शहराचे सिटी सर्वेचे काम मागील दिड वर्षापासुन कासवगतीने काम चालु असुन प्रत्येक्षात मिळकतींचे सर्वे नंबर व नकाशाचे ताळमेळ बसत नसुन देसाईगंज उप अधिक्षक भुमि अभिलेख कार्यालयाने फेरचौकशी सुरु करताच मोठ्या प्रमाणात अनियमितता व भोंगळ कारभार झाले असल्याचे निदर्शनास येताच भुखंड माफिया व जिल्हा अधिक्षक कार्यालयाचे पितळ उघडा पडणार येवढ्यात जिल्हा अधिक्षक भुमि अभिलेख कार्यालय गडचिरोलीने उप अधिक्षक भुमि अभिलेख कार्यालय देसाईगंज चे संपुर्ण अधिकार काढुन टाकल्याने पाणी कुठे तरी मुरत असल्याची दाट शक्यता वर्तविल्या जात आहे.
देसाईगंज शहरातील शहराच्या सिटी सर्वे बाबत नागरिकांची ज्वलंत व बहुप्रतिक्षित मागणी गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंग यांच्या शुभहस्ते दि ९ एप्रिल २०१८ ला सुरुवात झाली होती.गडचिरोली जिल्ह्यातील सर्वात पहिली नगरपरीषद, सर्वात मोठी बाजारपेठ व जिल्ह्यात एकमेव रेल्वे स्टेशन असलेल्या देसाईगंज शहराचा सिटी सर्वे बाबत तत्कालिन जिल्हाधिकारी ए एस आर नायक यांनी पुढाकार घेऊन ३० मे २०१६ ला जिल्हा अधिक्षक भुमिअभिलेख कार्यालय गडचिरोली यांना पत्र व्यवहार केल्यानंतर देसाईगंज सिटी सर्वे च्या कारवाई ला चांगलाच वेग आला होता.
त्यानंतर या पत्राचा संदर्भ देऊन मुख्याधिकारी नगर परिषद देसाईगंज यांनी २२ सप्टेंबर २०१७ ला भुमिअभिलेख कार्यालयास देसाईगंज शहराचा सिटी सर्वे बाबत पत्र व्यवहार केलेला होता. याबाबत उप अधिक्षक भुमिअभिलेख कार्यालय देसाईगंज यांच्या दिनांक २६ जुलै २०१७ अन्वये देसाईगंज नगर परिषद हद्दीतील मौजा विर्शितुकूम ,वडसा व नैनपुर येथिल नविन गांवठाण (सिटी सर्वे) मोजणी कामी येणाय्रा ३ करोड ४६ लक्ष ५८ हजार ६२५ रुपये एवढा खर्च दर्शविण्यात आलेला होता. याबाबत जिल्हाधिकारी गडचिरोली यांचेकडे १ करोड ७५ लक्ष रुपये पहिला हप्ता चा प्रस्ताव प्रशासकिय मंजुरी साठी ठेवण्यात आले होते.
देसाईगंज नगर परिषद हद्दीतील मौजा विर्शितुकूम वडसा व नैनपुर येथिल नगर भुमापन सिटी सर्वे चे काम हाती घेण्यासाठीची कार्यवाही जिल्हा अधिक्षक भुमिअभिलेख कार्यालयाने तातडीने पार पाडले होते. याबाबत मुख्याधिकारी नगर परिषद देसाईगंज यांना ६ आक्टोंबर २०१७ ला पत्रव्यवहार करुन नगर भुमापन कामी येणाय्रा खर्चाचे अंदाजपत्रक नमुद केलेल्या ३ करोड ४६ लक्ष ५८ हजार ६२५ रुपये पुर्णांकित ३ करोड ४६ लक्ष ५८ हजार ६०० रुपये पैकी ५० % रक्कम भरणा करुन भरणा केलेल्या चलनाची प्रत,तद्नंतर उर्वरित रक्कम २५℅ - २५℅ या प्रमाणे पुढील दोन वित्तीय वर्षात भरणा करण्यात येईल, याबाबत नगर परिषद देसाईगंज च्या ठरावासह, हमीपत्र जिल्हा अधिक्षक भुमिअभिलेख कार्यालय गडचिरोली यांना सादर करण्याचे कळविले होते.देसईगंज येथिल उप अधिक्षक भुमिअभिलेख कार्यालय शहराचे नगर भुमापनाचे काम यथासिघ्र सुरु करुन तीन वर्षात पुर्ण करण्यात येईल असे ही कळविले होते.आता ही संपुर्ण कार्यवाही पार पडली असुन देसाईगंज शहराचा सिटी सर्वे करिता आता पर्यंत २ कोटी ७८ लक्ष रुपये देण्यात आले आहे.
माहे जुलै २०१८ मधे झालेल्या कामांपैकी जूनी वडसा गांवचे काम २००० मिळकती कार्यालयात जमा न होता ज्यांचे आवक नोंदवहीत नोंद नाही अशा मिळकती ची परस्पर चौकशी करण्यासाठी जिल्ह्यातील इतर सर्व अधिकारी वर्गाच्या हातात देण्यात आले,मात्र अद्याप पूर्ण झाले नाही अशी विश्वसनिय माहिती प्राप्त झाली आहे. माहे जुलै २०१९ माहात देसाईगंज नगरपालिका प्रतिनिधी, जिल्हयातील सर्व कार्यालय प्रमुख व कर्मचारी याच्या सभेत एकुण १३ हजार मिळकती मोजण्याचा मुळ प्रस्ताव असताना मात्र ९ हजार ३०० एवढ्याच मिळकती देसाईगंज नगर परिषद हद्दीत आढळल्या व त्यांची मोजणी पूर्ण झाली असून ते काम उप अधिक्षक भुमि अभिलेख कार्यालय देसाईगंज वडसा या कार्यालयात जमा केले आहे असे कर्मचारी सांगता आहेत.
उर्वरित ३ हजार ७०० मिळकतींचे चौकशी काम उप अधिक्षक भुमि अभिलेख कार्यालय देसाईगंज वडसा कार्यालय प्रमुख यांनी मात्र तीन माहात पूर्ण करून जमा करण्यास सांगितले गेले,त्याप्रमाणे याचे कामही सुरू केले होते.परंतु, तत्पुर्वी ९ हजार ३०० मिळकतींचे झालेले मोजणी काम त्यावर सुपरइंपोज केलेले मुळ गाव नकाशा,सर्वेनंबरचे नकाशे, परावर्तीत भूमीचे नकाशे इत्यादी योग्य रितीने बसवलेच नसल्याने, खातेदारांची मिळकत, प्रत्यक्षात खरेदीखत व वहिवाट नुसार ज्या सर्वे क्रमांकाचा भाग असल्याचे दिसून येते, त्यानुसार मोजणी नकाशा दाखवत नसल्याचे आढळून आले. विर्शी येथील एका खातेदाराचा मिळकती वरुन वाद झाला असता, त्यांनी त्यांच्या जागेची अतीअती तातडी मोजणी करुन घेतली असता नगर भूमापन योजनेत तयार झालेला नकाशा चुकीचा असल्याचे स्पष्टपणे दिसून आले.त्यामुळे उर्वरित चौकशीचे काम तहकूब करावे लागले होते अशी माहिती आहे.
आता मोजणी करणार्या कर्मचार्यांना दुसऱ्या कामासाठी सोडून द्यावे असे आदेश जिल्हा अधिक्षक भुमि अभिलेख कार्यालय गडचिरोली येथुन देण्यात आले असल्याचे विश्वसनिय माहिती प्राप्त झाली आहे असुन मौजा नैनपूर, जूनी वडसा, विर्शीतुकुम या गावाचे नगर भुमापनाचे संपुर्ण काम जिल्हा अधिक्षक भुमि अभिलेख कार्यालय गडचिरोली कार्यालयात तात्काळ जमा करावे असे जिल्हा अधिक्षक भुमि अभिलेख कार्यालय गडचिरोली यांचे आदेश धडकल्याने देसाईगंज सिटी सर्वे मध्ये भोंगळ कारभार व मोठी अनियमितता असण्याची दाट शक्यता नाकारता येत नसुन पाणी कुठे तरी मुरत असल्याचे बोलले जात आहे...