Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, नोव्हेंबर २८, २०१९

नाट्यप्रेमींसाठी दुधात साखर


कालचा दिवस चंद्रपूर नाट्यप्रेमींसाठी दुधात साखर असा दिवस होता. ५९ व्या हौशी राज्य नाट्य स्पर्धेच्या १० व्या दिवशी डॉ श्यामा प्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालय चंद्रपूर निर्मित आणि निरंजन मार्कंडेय वार लिखित तसेच डॉ . प्राध्यापक जयश्री कापसे -गावंडे दिग्दर्शित हॅलो राधा मी रेहाना हि नाट्यकृती सादर करण्यात आली. ह्या नाटकाला नाट्यप्रेमींनी हकूप छान प्रतिसाद दिला. सगळ्या बाजूने हे नाटक उजवे ठरले . चंद्रपूरचे प्रियदर्शिनी सभागृह नाट्यपेमींनी खचाखच भरलेले होते, नाट्यगृहाला जत्रेचे रूप आले होते .
हॅलो राधा मी रेहाना हे नाटक केदारनाथ येथे घडते, ज्याचं जिवंत सादरीकरण दिग्दर्शकांनी त्यांचा शैलीतून सादर करून प्रेक्षकांना खिळवुन ठेवलं होत .
हे नाटक आहे राधा देशमुख आणि रेहाना ह्या दोन स्त्रियांची . राधा आपल्या नवर्यारसोबत केदारनाथला महादेवाचे दर्शन घ्यायला येते. पण महाप्रलयात तिचा नवरा पाण्याचा प्रवाहात वाहून जातो . ती स्वतः ला प्रलयातून कशी-बशी वाचवते आणि एका घरात आश्रयाला येते. जे घर रेहानाचे असते परंतु राधा तिला ते घर तिचेच आहे असे भासवते . विमनस्क अवस्थेतील रेहाना राधासोबत खेळ खेळल्यागत वागते . ती स्वतःचा परिचय रादह हुसैन असा देते . घराच्या दारावरची पाटी वाचून राधा जहीरची पत्नी असल्याची खात्री पटवून देते. विमनस्क अवस्थेतील रेहानाला राधा समजून घेण्याचा प्रयत्न करते. काही वेळात त्या दोघांची मैत्री होते. आणि पहिला अंक संपायचा काही क्षणा आधी एक धक्का म्हणजे कपाटातून एक प्रेत बाहेर येतो. त्या क्षणी राधाला समजत कि जहीर हा रेहानचा नवरा.
दुसऱ्या अंकात रेहाना राधाला सांगतो कि तिचा नवरा नराधम होता, त्यांनी एक एक करून तिचा तीन मुलींना मारलं. आणि टुरिस्ट म्हणून आलेल्या एका फॉरेनरसोबत तिचा कॉफीत गुंगी येण्याचा गोळ्या घालून तिला त्याचा सोबत झोपायला भाग पाडलं. ह्या सगळ्यांचा बदला म्हंणून तिने त्याला मारलं. त्या दोघीही मिळून जहीरच्या प्रेताची खोल दरीत फेकून विल्हेवाट लावतात. राधा आणि रेहाना मध्ये संख्या बहिणी सारखं प्रेम निर्माण होत त्यातच रेहानाला कळत कि राधा प्रेग्नेंट आहे. ती राधाची विशेष काळजी घेते. ती तिचा मुलगा किंवा मुलींमध्ये स्वतःला मावशी म्हणून बघू लागते . राधाला पण खूप आनंद होतो, ती आई होणार म्हणून . राधाचा लग्नाला सात वर्षे उलटल्यावरही तीला मुलं झाले नसल्यमुळे राजेशचे आई वडील दोघानाही केदारनाथला पाठवतात. परंतु केदारनाथमध्ये आलेल्या प्रलयामध्ये तिचा नवरा तिच्यासमोर पाण्यात वाहून जातो. ह्या प्रसंगामुळे ती सैरभैर होते रेहाना तिची काळजी घेऊन तिला समजण्याचा प्रयत्न करते. नाटकाचा शेवटाला प्रलय तांडव रेहानचा घरापर्यंत पोहचते . त्या दोघी स्वतःला वाचवत एका ठिकाणी पोहचतात. आणि रेस्क्यु टीमची वाट पाहतात. त्याच वेळेस एक हेलिकॉप्टर तिथे पोहचतो परंतु त्यात एका वयक्तिक जागा असल्यामुळे रेहाना राधाला तिथून बाहेर निघायला भाग पाडते .
दिग्दर्शक जयश्री कापसे -गावंडे ह्यांनी त्यांचा दिग्दर्शनातून हॅलो राधा मी रेहाना ह्या नाटकात केदारनाथ मध्ये होणाऱ्या प्रयलाचा तांडवातही सामाजिक ऐक्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे राधा आणि रेहाना ह्या दोघांचाही मानसिक अवस्था दर्शवणारे हे नाटक हिंसाचार, लैगिक व्यभिचार समाजाचा विकृतीमुळे होत असलेला ऱ्हास दाखवण्याचा प्रयत्न करते. प्रामुख्याने स्त्री भ्रूणहत्ये संदर्भात भाष्य करताना मातृत्वाचा सन्मानही या नाटकात करण्यात आला आहे. प्रलयाचे तांडव हे एक प्रकारे सिम्बॉल आहे ते वाढत्या स्त्री भ्रूणहत्येचे. आणि सिम्बॉलिकली दाखवण्याचा खूप छान प्रयत्न दिगदर्शक जयश्री कापसे-गावंडे ह्यांनी केला आहे .
पूर्ण नाटकात दोन पात्र आहेत . एक म्हणजे राधा आणि दुसरे रेहाना, ह्यात अनुक्रमे रोहिणी उईके आणि नूतन धवने . ह्या दोन्ही कलावंतांनी जीव ओतून त्याचे पात्र जिवंत केले आहे . पहिल्या अंकात नूतन धवणे ह्यांनी विमनस्क अशी राधा तर दुसऱ्या अंकात एक समजदार जी राधाला समजून घेणारी, अशा प्रकारे ट्राजीशन असलेले दोन पात्र उभे केले आहेत. रोहिणी उईकेन ह्यांनी समजदार थोडी घाबरलेली आणि दुसऱ्या अंकात तिचा नवरा प्रलयाचा पाण्यात वाहून गेल्यानंतर झालेली अवस्था ह्या दोन अवस्था अधोरेखित करण्याचा प्रयत्न केलेला आहे .
हॅलो राधा मी रेहाना हे नाटक केदारनाथ मध्ये आलेल्या प्रलयाचे दर्शन दाखवणारे असल्यामुळे ते नेपथ्यद्वारे दाखवणे एक प्रकारचे आव्हान होते आणि ते आव्हान पेलवून धरले ते नेपथ्यकार पंकज नवघरे आणि तेजराज चिकटवार ह्यांनी. रेहानचे घर उभारताना फ्रेमवर्क चा उपयोग करण्यात आलेला आहे . ज्यावेळी प्रसंग बाहेर घडतात त्यावेळी घरावर मोठे कापड झाकून मोठ्या पर्वतरांगा दाखवण्यात आले आहे . कार चालविण्याचा प्रसंगात त्यातील सवांद जिवंत वाटावे यासाठी प्रत्यक्ष कर रंगमंचावर आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे . शेवटचा प्रसंगात पर्वतरांगा, खडक या माध्यमातून प्रलयाचे तांडव साकारण्याचा प्रयत्न नेपथ्या मधून दाखविण्यात आले आहे.
रात्री ११च्या सुमारास सुरु होणारे नाटक सकाळी ६ पर्यंत सुरु राहते . त्यामुळे प्रकाशयोजना हा अतिशय महत्वपूर्ण भाग प्रकाशयोजनाकार हेमंत गुहे हयांनी केला आहे . प्रलयाचा पार्श्वभूमीवर प्रकाशचे स्रोत कमी जास्त होत जातात. प्रामुख्याने मोबाइल टार्च, मेणबत्ती , दिवा यांची प्रकाशसंगतो खूप छान दाखविण्यात आली आहे . . दोन्ही पात्रांचा आयुष्यातील चढउतार दाखविताना त्यांचा आयुष्यातील अंधकार प्रामुख्याने अधोरेखित करण्यासाठी सकाळचा सूर्यप्रकाश दाखवून त्याचा आयष्याची होणारी नवी सुरवात दखदखविण्याचा सुंदर प्रयत्न प्रकाशयोजनेतून केला आहे

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.