श्रीकांत मोहारे यांची मागणी
गडचांदूर/प्रतिनिधी:
गडचांदूर येथील सर्वात मोठा प्रभाग असलेल्या प्रभाग एक मध्ये समस्यांचा डोंगर उभा असून या समस्यांकडे त्वरित लक्ष देण्याची मागणी येथील नागरिक श्रीकांत मोहारे यांनी केली आहे.
प्रभाग एक भौगोलिक आणि लोकसंख्या नि मोठा प्रभाग असून या वॉर्डात पाहिजे त्या सोयसुविधेचा अभाव दिसत आहे.मागील पाच वर्षात याठिकाणी साधे रस्ते आणि नाल्या न झाल्याने अनेक नागरिक नाराज असल्याचे चित्र समोर आले आहे.
साई मंदिर ते हनुमान मंदिर रस्ता गेल्या पाच वर्षात शेकडो ठिकाणी फुटून असून रात्रोला वॉर्डातील नागरिकांना भयावह त्रास सोसावा लागत आहे.या प्रभागात उन्हाळ्यात पणायची भीषण टंचाई असते.शासनाने 10 करोड रुपयांची जलशुद्धीकरण केंद्र दिले परंतु आजतागायत वर्षे उलटली परंतु पाण्याचे नळ नागरिकांच्या सेवेत आलेले नाही.त्यामुळे सध्या या प्रभागातील नागरिक मागील काही वर्षांपासून नाराजीचा सूर उमटवू लागल्याने प्रश्न निर्माण झाले आहे.
या प्रभागात मागील काही दिवसात कुत्रे आणि डुकराणी हौदोस केला असून या विषयी ची तक्रार सुद्धा केली.परंतु परिस्थिती जैसेथे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.येत्या काही दिवसात या समस्या नसुटल्यास वॉर्डातील नगरीक आंदोलन करणार असल्याचे श्रीकांत मोहारे यांनी सांगितले.
वॉर्डातील नगरसेवक फक्त पाच वर्षे नावापुरती होती काय ..? असा सार्थ प्रश्न नागरिकांना पडला असल्याने या नगरसेवकवरती नागरिक नाराज असल्याचे म्हणणे आहे.
प्रभाग एकमधील रस्ते नाल्या सांडपाणी वॉर्डातील दूषित कचरा या समस्येचे त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत मोहरे यांनी केला आहे.
वॉर्डात सध्य परिस्थिती अतिशय समस्याग्रस्त आहे.प्रभागात रस्ते नाल्याचा गंभीर प्रश्न असून याकडे नगरसेवकाणी लक्ष न दिल्याने नागरिकात नाराजीचा सूर असून समस्या त्वरित सोडवाव्या.