नागपूर/प्रतिनिधी:
वीजबिलापोटी थकबाकीची वसुली करण्यास गेलेल्या महावितरण कर्मचा-यांना महावितरण कर्मचा-यांना मारहाण व शिविगाळ केल्याच्या दोन घटनांमध्ये स्थानिक गणेशपेठ आणि इमामवाडा पोलीस ठाण्यात दोषींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिल्या घटनेत सिरसपेठ येथे सोमवार (दि. 4) रोजी सकाळी 11.30 च्या सुमारास वीजबिलापोटी असलेल्या थकबाकीची वसुली करण्यासाठी महावितरण कर्मचारी रमेश कमाले आणि वसुली कर्मचारी देवराव राहाटे हे किसन वासुदेव गायधने व शिलाबाई गोपाल गायधने यांचेकडे जाऊन त्यांनी 10 नोव्हेंबरपर्यंत थकबाकीचा भरणा न केल्यास 11 नोव्हेंबर रोजी वीजपुरवठा खंडित केला जाईल असे सांगितले असता, या दोन्ही ग्राहकांनी कमाले आणि राहाटे यांना शिविगाळ करुन मारण्याची धमकी दित त्यांचेवर हल्ला केला.
याप्रकरणी ईमामवाडा पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपींविरोधात भा.दं.सं. च्या कलम 504 व 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुस-या एका घटनेत सोमवार (दि. 4) रोजी दुपारी 12.30 च्या सुमारास महावितरण कर्मचारी मुनेश्वर कापसे व राहुल मेश्राम हे वसुली कर्मचारी अक्षय परासकर यांचेसोबत भालदारपुरा येथील बडा मस्जिद परिसरातील अब्दुल्लाबेग चामूबेग या ग्राहकाकडील सुमारे 1 लाख 58 हजाराच्या थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित करून दुस-या ग्राहकाकडे कारवाईसाठी गेले असता परवेज खान या आरोपीने या तिन्ही वीज कर्मचा-यांना शिविगाळ करून मारहाण केली,
याशिवाय या वीज कर्मचा-यांच्या अंगावर गाडी चालवून त्यांना जीवे मारण्याचाही प्रयत्न केला. याप्रकरणी गणेशपेठ पोलीसांनी भा.दं.सं. च्या कलम 323, 504 व 506 या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी दोषींविरोधात कठोर कारवाई व्हावी यासाठी महावितरण प्रशासन वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करणार असल्याची माहिती महावितरणने दिली आहे.