चंद्रपूर/विशेष प्रतिनिधी:
सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत 20 नोव्हेंबर 2019 रोजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, चंद्रपूर येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या मेळाव्यामध्ये एकूण 5 कंपन्यांचे अधिकारी उपस्थित राहणार असून त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या विविध पदांसाठी उमेदवारांची निवड करणार आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी सेवायोजन कार्ड, स्वतःचा बायोडेटा, पासपोर्ट फोटो, शैक्षणिक प्रमाणपत्राच्या झेरॉक्स इत्यादी आवश्यक कागदपत्रसह शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, चंद्रपूर येथील कौशल्यम सभागृह येथे 20 नोव्हेंबर रोजी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास विभागाचे सहाय्यक संचालक भैय्याजी येरमे यांनी केले आहे.