Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, सप्टेंबर १०, २०१९

चंद्रपूर:गणेश विसर्जना निमित्य शहरातील वाहतुकीत बदल


चंद्रपूर/प्रतिनिधी:
चंद्रपूर शहरातील मुख्य गणेश विसर्जन कार्यक्रम दिनांक 12/09/19 रोजी होणार असून पोलीस अधीक्षक श्री डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी अधिसूचना निर्गमित करुन दि. १२/०९/१९ चे ६:०० पासुन ते १३/०९/१९ चे ६:०० वा. खालील प्रमाणे वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.

१) सावरकर चौक ते बस स्टॅन्ड -प्रियदर्शनी चौक जेतपुरा गेट -कस्तुरबा चौक- गांधी चौक तसेच पठाणपुरा गेट ते जटपुरा गेट हा रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांना बंद करण्यात आला आहे... 

२) नागपूर रोडणे येऊन बल्लारशा किंवा मुल कडे जाणारी वाहने ही प्रियदर्शनी चौकाकडे जाण्यास बंदी करण्यात आली असून त्यांनी वरोरा नाका- सावरकर चौक- बंगाली कॅम्प या मार्गाचा अवलंब करावा.

३) नागपूर कडून शहरांमध्ये जाणारी हलकी वाहने यांनी घुटकाळा- श्री टॉकीज- पठाणपुरा परिस परिसराकडे जावयाचे असल्यास जुना वरोरा नाका येथून उजवीकडे वळण घेऊन आंबेडकर कॉलेज- संत केबलराम चौक- सवारी बंगला- नगीना बाग ते चोर खिडकी मार्गे शहरात प्रवेश करावा.

४) मूल किंवा बल्लारशा कडून नागपूर कडे जाणारी सर्व प्रकारची वाहने ही बंगाली कॅम्प -सावरकर चौक- नवीन उड्डाणपूल मार्गे नागपूर कडे जातील.

५) चंद्रपूर पोलीस स्टेशन हद्दीतील रहिवाशांनी नागपूर, वनी, घुगुस, गडचांदूर कडे जाण्यासाठी रहमत नगर, नगीना बाग व इतर परिसरातून जाण्यासाठी बिनबा गेट- रहमत नगर- दाताळा रोड या मार्गाचा अवलंब करावा.

६) बल्लारशा व मुल कडून येणारी वाहनांना शहरात जावयाचे असल्यास बस स्टॅन्ड- एलआयसी ऑफिस- बगड खिडकी मार्गे किंवा जुना चौकातून किंवा प्रसन्ना पेट्रोल पंप कडून बाबुपेठ मार्गे फक्त आंचलेस्वर गेटपर्यंत प्रवेश करता येईल. 

🚳 नो पार्किंग झोन🚳

१) जेटपुरा गेट ते कस्तुरबा चौक

२) जेटपुरा गेट ते रामाळा तलाव

३) जेटपुरा गेट ते दवा बाजार

४) जेटपुरा गेट ते प्रियदर्शनी चौक 

५) कस्तुरबा चौक ते गांधी चौक ते जेटपुरा गेट पर्यंत.

६) कस्तुरबा चौक ते अंचलेश्वर गेट

७) गांधी चौक ते मिलन चौक ते जोड देऊळ..

८) कस्तुरबा चौक ते जेल रोड चौक

९) दस्तगीर चौक ते मिलन चौक.

१०) मिलन चौक ते बजाज पॉलिटेक्निक कॉलेज

११) हिंदी सिटी हायस्कूल ते रघुवंशी कॉम्प्लेक्स

१२) मौलाना आझाद चौक ते जयंत टॉकीज चौक

१३) छोटा बाजार चौक ते पाताळेश्वर मंदिर 

ही ठिकाणे नो- पार्किंग झोन व नो- हॉकर्स झोन म्हणून घोषित करण्यात आली आहेत. वरील ठिकाणी कोणत्याही प्रकारची वाहने नागरिकांनी पार्क करू नये.. 

🚘पार्किंग झोन🚗

गणेशभक्तांची वाहने पार्क करता यावीत याकरिता खालील ठिकाणी पार्किंग झोन म्हणून घोषित करण्यात आले आहेत.. 

१) चांदा क्लब ग्राउंड

२) आंबेडकर कॉलेज

३) सेंट मायकल हायस्कूल नगीनाबाग

४) सिंधी पंचायत भवन च्या बाजूला खाली असलेली जागा.

५) पठाणपुरा व्यायाम शाळा

६) महाकाली मंदिर ग्राउंड

७) डीएड कॉलेज बाबुपेठ.‌ 

वरील प्रमाणे वाहतुकीत करण्यात आलेला बदल हा दिनांक 12 सप्टेंबर 2019 चे सकाळी ६:०० वाजता पासून ते दिनांक 13 सप्टेंबर 2019 चे सकाळी ६:०० वाजेपर्यंत अंमलात राहील.. 

गणेश विसर्जन दरम्यान नागरिकांनी पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी केले आहे...

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.