मोठ्या प्रमाणात दारू असल्यामुळे नविन ठानेदार श्री निशिकांत रामटेके यांनी नवरगावच्या पोलिस चौकी मधे असणाऱ्या पूर्ण जुन्या कर्मचारीच्या बदल्या सिंदेवाहिला करुण, सिंदेवाहिच्या नविन पोलिस टीमला नवरगाव चौकिला 1 /8/2019 पासून रुजू केले.तेव्हापासून नविन टीम ही दारू विक्री करणाऱ्या लोकांसाठी कर्दन काळ ठरली आहे. वास्तविक पाहता या 1 तारखेला दारू विक्री करणाऱ्याची एक मीटिंग पोलिस स्टेशन सिंदेवाहिला घेण्यात आली होती व् त्यांना आता दारुची एक बॉटल सुधा मिळेल तरी कठोर कारवाई करू अशी ताकित देण्यात आली होती .मात्र काही लोकांनी आपला धंदा धाकेच्या अभावाने बंद केला आहे, मात्र काही लोक धाडस करुण आपले दुकान सुरूच ठेवले आहे.त्यामुळे आता या लोकांनवरती नजर व् ताबा ठेवण्याकरिता नविन कर्मच्यारयाची पोलिस टीम नवरगावला पाठवली व् त्यांनी चौकिला रुजू होताच आपली कामगिरी पहिल्या दिवसा पासूनच सुरु केली रोजच्या कारवाईचा विचार केला अस्ता आतापर्यन्त 10 ते 12 केसेस करण्यात आलेल्या आहे अशी माहिती चौकीतुन मिळालेली आहेे.आज सुधा अशीच दोन दारू विक्री करण्याऱ्या लोकांवर्ति कारवाई करण्यात आली.
महत्वाचे् म्हणजे 1 तारखेपासून दारू विक्री बंद करा अशे सांगीतल्या मुळे जे दारू विक्रेते होते त्यांनी आपली दारू विक्री बंद ठेवली मात्र जे आता पर्यन्त कधीच हा व्यवसाय करत नव्हते ते ही मात्र आता पैसेच्या लालच्यासाठी स्वता दारू आणून विक्री करू लागले आहे.आता पर्यन्त केलेल्या कारवाइत नविन दारू विक्री करणारे आढळून आले आहे.नविन पोलिस टीम मुळे दारू विक्रेत्याचे धाबे दनानले आहेत.नविन टीम मधे आलेले कर्मचारी पोहवा विनोद बावणे ब,न,1188,पोहवा वसंता नागरिकर 929, नापोशी विजय वाकडे 1116, पोशी मंगेश श्रीरामे या नविन आलेल्या टीमच्या कामगिरीमुळे नवरगाव मधे असणारी सामाजिक संघठना नविन पोलिस टीमचे ठाणेदारांनी यांचे आभार वक्त करीत आहे.व् अशीच मोहीम ही सतत नविन टीम राबवनार का याकडे नवरगाव मधील नागरिकांचे लक्ष्य लागलेले आहे.