यवतमाळ/प्रतिनिधी:
यवतमाळात राष्ट्रध्वजाच्या अवमान प्रकरणी खापरीच्या सरपंचावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
![तिरà¤à¤à¤¾ धà¥à¤µà¤ à¤à¤²à¤à¤¾ फडà¤à¤µà¤¿à¤£à¥à¤¯à¤¾à¤¤ à¤à¤²à¤¾ साठॠà¤à¤®à¥à¤ परिणाम](https://images.loksatta.com/2017/08/Flag-of-India.jpg)
सरपंच शंकर काकडे यांच्या हस्ते सकाळी 7.30 वाजता ध्वजारोहन करण्यात आले. पण तिरंगा ध्वज उलटा फडकविण्यात आला. ही बाब लोकांच्या लक्षात येताच सरपंच काकडे यांनी लगेच झेंडा उतरवून पुन्हा सरळ करून फडकाविला.मात्र हा राष्ट्रध्वजाचा अपमान असून सरपंचकडून हि चूक झाली कशी अस म्हणत,ग्रामपंचायतीचे सदस्य राहुल खांडरे यांनी राष्ट्रीय गौरव अपमान निवारण अधिनियम 1971च्या कायद्यानुसार पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.