नागपूर/ललित लांजेवार:
चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी वनविभागातील प्रस्तावित “घोडाझरी अभयारण्यात येणाऱ्या पर्यटकांसाठी हिरमुस करणारी बातमी आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात झालेल्या संततधार पावसामुळे घोडाझरी तलाव ओव्हरफ्लो झाला आहे, तलावात लहरी मोठ्या प्रमाणात दिसून आल्या असल्याकारणाने प्रशासनाने 15 ऑगस्ट 2019 रोजी येणाऱ्या सर्व पर्यटकांसाठी हे अभयारण्य सुरक्षेच्या कारणास्तव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती एका प्रसिद्धी पत्रकातून मिळाली असून यासंदर्भात वनविभाग ब्रह्मपुरी यांचेशी संपर्क केला असता घोडाझरी अभयारण्याची 15 ऑगस्ट सकाळी असणारी स्थिती बघता निर्णय घेण्यात येईल अशी माहिती दिली.
दरवर्षी मोठ्या प्रमाणात 15 ऑगस्ट 26 जानेवारी ,महाराष्ट्र दिन, 1 जानेवारी 31 डिसेंबर या दिवशी मोठ्या प्रमाणात या घोडाझरी अभयारण्यात मजा लुटण्यासाठी येत असतात,
मात्र यंदा पर्यटकांना या घोडाझरी पर्यटन स्थळावर आनंद घेता येणार नाही, सोबतच यासंबंधीतील सुचना नागभीड पोलिस स्टेशन ,तहसीलदार नागभीड ,तसेच ब्रह्मपुरी वनविभाग यांना प्रतिलिपी पाठवण्यात आलेले आहेत, असा प्रति लिपीतच लेख आहे मात्र हे पत्र अजून पर्यंत वनविभागाकडून कोणाला देण्यात न आल्यामुळे नेमके हे पत्र वायरल झाले तरी कसे हा मात्र चौकशीचा विषय आहे.