नागपूर/प्रतिनिधी
गोंदिया ते गोवा सीमेपर्यंत पसरलेल्या, 16 जिल्ह्यातील 325 शाखा असलेल्या विर्दभ कोकण ग्रामीण बँकेचे मुख्यालय नागपूर ला प्रतापनगर येथे आहे. ही बँक बँक ऑफ इंडिया ची पुरस्कूत बँक आहे. गेल्या एक वर्षापासून कर्मचारी त्रस्त झाले होते. काल दिनांक 2.7.19 ला EMBEA च्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांनी संध्याकाळी 5.30 ला जोरदार निदर्शने केली. कर्मचाऱ्यांना बदली केल्यास कोर्टात जाता येणार नाही असे प्रतिज्ञा पत्र लिहून घेणे, सेवानिवृत्त लोकांना वेळेवर पेंशन न देणे, महिला कर्मचाऱ्यांच्या विनंती बदली वर विचार न करणे, व्हाँटअप्स मँसेज ने सतत धमकी देणे, महिला कर्मचाऱ्यांना सुरक्षा व्यवस्था न करता
काम करायला भाग पाडणे, अश्या अनेक प्रकारच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी ईएमबीईए ने निर्दशने आयोजित केली होती.
ईएमबीईए चे अध्यक्ष काँ सुरेश बोभाटे, महासचिव काँ जयंत गुर्वे यांच्या नेतृत्वाखाली जवळपास 150 कर्मचारी निर्दशनास सहभागी झाले होते. काँ सत्यशील रेवतकर, काँ मिलिंद वासनिक व अन्य अनेक ईएमबीईए चे नेते उपस्थित होते.
अध्यक्षांनी न भेटताच काढता पाय घेतला. तर महाप्रबंधक महोदय यांनी कोणत्याही प्रश्न ा
वर समस्येवर कोणतेही मत व्यक्त करण्यासाठी असमर्थ ता प्रगट केली. महाप्रबंधक यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. समस्या दूर न झाल्यास अधिक त्रिव आंदोलने करण्यात येणार असे काँ बोभाटे व काँ गुर्वे यांनी स्पष्ट केले आहे.