Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, जुलै ०७, २०१९

आरोग्य हीच खऱ्या अर्थाने माणसाची चिरंजीव संपत्ती:आ.समीर मेघे

दवलामेटीत रोगनिदान व उपचार शिबीर संपन्न

७२५ शिबिरार्थीना निःशुल्क औषधी वितरण

नागपूर / अरुण कराळे:



 निरोगी व उत्तम आरोग्यासाठी सकस आहार,नियमित व्यायाम,आवश्यक विश्रांती तसेच रोगावर योग्य उपचार घेणे अत्यंत आवश्यक आहे .शारीरिक, मानसिक,सामाजिक दृष्टीने व्यवस्थित आणि रोगमुक्त असणे म्हणजेच चांगले आरोग्य होय.त्यासाठी आपले दैनंदिन जीवन कितीही धकाधकीचे असतानाही आपल्यासाठी वेळातून वेळ काढणे आज काळाची गरज आहे .माणसाकडे कितीही पैसा असलापण त्याची तब्येत निरोगी न्सल्टर संपत्तीचा काहीही उपयोग नसतो. कारण आरोग्य हिच खऱ्या अर्थाने माणसाची चिरंजीव संपत्ती आहे असे प्रतिपादन  आमदार समीर मेघे यांनी उपस्थित ग्रामस्थ व शिबिरार्थीना केले.


नागपूर तालुक्यातील दवलामेटी  ग्रामपंचायत कार्यालय परिसरात दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्था द्वारा संचालित सावंगी मेघे येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय यांच्या वतीने आयोजित विविध आजारावर निदान व उपचार शिबिराचे उदघाटनआमदार समीर मेघे यांचे हस्ते तसेच पं . स .उपसभापती सुजित नितनवरे,सरपंच आनंदी कपनीचोर,उपसरपंच गजानन रामेकर,लाव्हा सरपंच ज्योत्स्ना नितनवरे,माजी सरपंच देवराव कडू, वाडीचे नगरसेवक दिनेश कोचे,ग्रामविकास अधिकारी विष्णू पोटभरे, ग्रा. प .सदस्य नितीन अडसड,प्रशांत केवटे,आनंदबाबू  कदम,कमलाकर इंगळे,प्रकाश डवरे, भीमराव मोटघरे,संजय कपनीचोर,उषा इखनकर,देवेंद्र बोरीकर, रवींद्र खैरकर  यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.



शिबिरात ७२५ रुग्णाची तपासणी विनोबा भावे रुग्णालयाचे जण संपर्क अधिकारी नाना शिंगणे,वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता सुरेश चरडे,शिबीर प्रभारी डॉ . सारिका डाखोळे यांच्या मार्गदर्शनात २० तज्ञ डॉक्टरांच्या चमुनी रक्तदाब,शुगर,किडनीचे आजार,हृदयरोग,हायड्रोसील,आतड्याचेआजार,मुतखडा,पोटाचे,डोळ्याचे आजार,गलगंड,मोतीया बिंदू,मासिक पाळी,रक्तस्त्राव,लहान मुलांचे विविध आजार,कान,नाक,घसा,कातडीचेआजार,फ्रॅक्चर,हाडाचे,दाताचे,मुखाचे,छाती तसेच दमा-खोकला आजाराचे निदान करून रुग्णांना निशुल्क औषधी वितरित करण्यात आली.यावेळी ग्राम पंचायत सदस्य रश्मी पाटील,सविता खोब्रागडे,आरती ढोके,ईशान गजभिये,रागिणी चांदेकर,रमेश गोमासे,शुभांगी फुलझेले, कमला पेंदाम,सुनील महाजन,अशोक मड्रेवार, कल्पना गवई,प्रभा भोयर,हेमलता खैरकर प्रामुख्याने उपस्थित होते.


शिबिराच्या आयोजनासाठी  विशाल कुमरे,मयूर मानकर,कपील दारसीमवार,सुनील आंदोलकर,कार्तिक पारधी,राज शेंडे,शरद कोहळे,सचिन खिलारे,लक्ष्मण इटकर,मयूर झारखंडे,उमेश शेंद्रे, अमन खोब्रागडे, मिलिंद निकोसे,रुपेश चव्हाण,सौरभ मानकर,वैभव बावणे,अतुल नागपुरे,ज्ञानेशवर गुरवे, सूरज करांडे, श्यामकुमार गजभिये,आदींनी सहकार्य केले कार्यक्रमाचे संचालन सचिव विष्णू पोटभरे यांनी केले .


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.