चंद्रपूर/प्रतिनिधी:
जिल्ह्यातील बल्लारपूर आष्टी मार्गावर असलेल्या दहेली गावाजवळचा पूल सोमवारी सकाळी 5वाजताच्या सुमारास वाहून गेल्याने बल्लारपूर व चंद्रपूर येणारी वाहतूक ठप्प झाली आहे. वाहतूक ठप्प झाल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा या ठिकाणी बघायला मिळाल्या,या मार्गावर राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असून दुसऱ्या पुलाचे देखील काम सुरू आहे.
या पुलाच्या बांधकामासाठी त्याला लागूनच पर्यायी रस्ता सीमेंट पाईप टाकून तयार केला होता. हा उपरस्ताच वाहून गेल्याने या ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लावून शेकडो गाड्या खोळंबल्या असून प्रवासी गाड्यांमध्ये अडकून पडले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील काही ठिकाणी चांगलाच मुसळधार पाऊस सुरू असून काही भागात जोरदार पावसाचा मारा आहे.