चंद्रपुर/ललित लांजेवार:
चंद्रपुर शहरातील रामाला तलाव चौपाटी परिसरात एक अनियंत्रित चारचाकी वाहन एका घरात शिरले,
हे अनियंत्रित वाहन बगड खिडकीकडे जात असताना तिथे लागून असलेल्या घरात शिरले,या घटनेत एक बालक जखमी झाले असुन त्याचेवर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे
या घटनेनंतर एकच खळबळ उडाली असून यात उपस्थित नागरिक थोडक्यात बचावले मात्र एका छोट्या बालकाला यात इजा झाली.
संध्याकाळी असल्यामुळे बरेच लोक या ठिकाणी फिरायला येतात मात्र घटना स्थळी जास्त लोक नसल्याने नागरिक बचावले. दीड वर्षांपूर्वी अशीच एक घटना या परिसरात घडली होती या घटनेत दोन मित्रांना आपला जीव गमवावा लागला होता.
या घटनेनंतर चंद्रपूर शहर महापालिकेच्या आमसभेत या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे व पोलिस बंदोबस्त करण्यात येणार असा प्रस्ताव मागील 2 वर्षपूर्वी ठेवला होता मात्र अजून त्या प्रस्तावाला हिरवा कंदील न मिळाल्याने या परिसराचा आवारा मजनु व टवाळक्या करणारे पोर तमाशे करत फिरत असतात.
त्यामुळे दररोज सायंकाळी या परिसरातील शांतता टवाळखोरांना मुळे भंग होते,याकडे पोलिस प्रशासन गांभीर्याने घेतील का? टवाळ खोरांवर नजर ठेवन्यास या परिसरात पोलिस चौकी बनणार का ?आज प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.