स्क्च्छतागृहाच्या बांधकामासाठी ग्रामपंचायत परिसरातील खोदलेल्या खड्यात एका पाच वर्षीय चिमुकल्याचा बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी नागपूर येथील दवलामेटी रामजी नगर येथे उघडकीस आली.
आर्यन नवदीप राऊत वय ५ वर्षे असे या मृत बालकाचे नाव आहे. तो सोमवारी सायंकाळ पासून बेपत्ता होता.तो घरी परतला नसल्याने त्याचा शोध परिवारातील व इतर नागरिकांनी घेतला असता तो सापडला नसल्याने अपहरणाचा संशय व्यक्त करीत वाडी पोलिसात तक्रार देण्यात आली,त्यानंतर मंगळवारी देखील सकाळी त्याचा शोध घेतल्या गेला,