चंद्रपूर/प्रतिनिधी:
सिंदेवाही तालुक्यात वाघ आणि बिबट्याची दहशत कायम असून मागील दहा दिवसात आत्तापर्यंत चार जणांचा जीव गेला आहे. शुक्रवारी पुन्हा सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही येथील चिक मारा मार्ग थ्रेशर मशीन जवळ अशोक जंगलु चौधरी या 57वर्षांच्या वनमजुराला वाघाने आपले शिकार बनविले.
मागील दहा दिवसात गडबोरी येथे बिबट्याने अवघ्या 9 महिन्याच्या चिमुकल्याला घराच्या अंगणातून उचलून नेले. दोन दिवसानंतर बिबट्याने पुन्हा एका 65 वर्षीय वृद्धेला घरून उचलून घोट घेतला. या घटनेनंतर गावात तणाव निर्माण झाला होता. त्यावर जोवर पालकमंत्री मुनगंटीवार घटनास्थळी येत नाही तोवर मृतदेह उचलणार नाही असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला. अखेर वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी येथे प्रत्यक्ष भेट देऊन लिखित आश्वासन दिल्यानंतरच तणाव निवळला होता.9 तारखेला मुरमाडी येथे एका पट्टेदार वाघाने तुळशीराम पेंदाम या 65 वर्षीय गुराख्याला ठार केले.व शुक्रवारी परत गुंजेवाही येथील चिक मारा मार्ग थ्रेशर मशीन जवळ अशोक जंगलु चौधरी या 57वर्षांच्या वनमजुराला वाघाने आपले शिकार बनविले.त्यामुळे वनमंत्र्यांच्याच जिल्ह्यात मानव वन्यजीव संघर्ष आत्ता पेटला असून वनमंत्री यावर कसा तोडगा काढतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे, सध्या सिंदेवाही तालुक्यात हिंस्र प्राण्यांची दहशत सिंदेवाही तालुक्यात कायम असून गावकरी आपला जीव मूठीत घेवून जगत आहेत.