मूल/रमेश महुरपवार:
मूल नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 6 मधील होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीसाठी दोन उमेदवारांचे 4 नामांकन अर्ज दाखल झाले. नामांकन अर्ज दाखल करण्याची आज ता. 6 शेवटचा दिवस होता. मागील निवडणुकीत भाजप तिकिटावर निवडून आलेल्या संगीता वाळके यांना तीन असल्याचा अपत्याच्या कारणावरून नगर सेवक पदासाठी अपात्र ठरविण्यात आले. रिक्त झालेल्या सदर जागेसाठी ता. 23 जून ला निवडणूक घेण्यात येत आहे. ही पोट निवडणूक नगर परिषदेत सत्तारूढ असलेल्या भाजप आणि विरोधी पक्ष कॉंग्रेससाठी प्रतिष्ठेची आहे. अनुसूचीत जाती करीता आरक्षित असलेल्या या एका जागेच्या निवडणुकीसाठी कॉंग्रेस कडून ललीता सुरेश फुलझेले यांनी तर भाजप कडून शिल्पा युगविनाश रामटेके यांनी नामांकन अर्ज दाखल केले. उद्या होणाऱ्या छाननी नंतर उमेदवारांची अंतिम यादी प्रकाशीत केली जाणार आहे.