Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, जून ०७, २०१९

सिंदेवाही तालुक्यातील तिन ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूका

सिंगडझरी ,पवनापार ,पवनाचक ग्रामपंचायत 
प्रशांत गेडाम/सिंदेवाही 

सिंदेवाही तालुक्यातील सिंगडझरी,पवनपार, पवनाचक या तीन ही ग्रामपंचायत च्या मुदत संपुष्टात आली आहे.
निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला .या तिन्ही ग्रामपंचायतीसाठी येत्या 23 जून रोजी मतदान घेण्यात येणार असल्याची माहिती सिंदेवाही तहसीलदार श्री. अमोल पाठक निवडणूक अधिकारी , निवडणूक निर्णय अधिकारी काबंळे साहेब , शामकुळे, शिंदे यांनी दिली आहे.

पवनपार येथे सरपंच पदाचे आरक्षण ना.मा.प्र- महिला
सिंगडझरी या गावचे सरपंच पदाचे अनुसूचित जमाती महिला व पवनाचक येथे सरपंच पदाचे आरक्षण सर्वसाधारण आहे. 31 मे ते 6 जून या कालावधीत नाम निर्देशनपत्र दाखल करावयाची आहेत. 7 जून रोजी या निर्देशन पत्राची छाननी केली जाणार आहे .नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची तारीख 10 जून आहे.त्यादिवशी निवडणूक चिन्ह वाटप व उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.मतदान 23 जून रोजी होणार असून मतमोजणी 24 जून रोजी होईल.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.